Skip to main content

मुरली - १९

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - १९

कृष्णाने मानेनेच होकार दिला आणि उजव्या हाताने सर्व गाडी घोडे आणि जनसामान्य याना थांबण्यास सांगितले . त्या एका इशाऱ्यासरशी सर्व लवाजमा थाबला आणि जागा शोधण्या साठी पांगापांग झाली. कृष्ण, बलराम आणि समस्त राण्या या एका डेरेदार वट वृक्षाखाली न्याहारी आणि थोड्याश्या विश्रांतीसाठी थांबले. बाकीच्यांनी सुद्धा सावलीच्या जागा बघून न्याहारी उरकली. थोडा विश्रामसुद्धा झाला. हे सर्व होत असताना कृष्ण बलराम जातीने फिरून होता होईल तितक्या लोकांची व्यक्तिगत विचारपूस करत होते.

सारे जण आश्चर्यचकित होत होते. पण कृष्ण आणि बलराम यांच्यासाठी ही नवीन बाब नव्हती. सर्वांची विचारपूस करणं आणि सर्वांना विश्वास देणं ही जनरीत होती कृष्णाच्या राज्यात. त्याला अनुसरून नैसर्गिक वागणूक होती दोन्ही भावांची., याच एक महत्वाच कारण म्हणजे गोकुळातल्या नंदाच्या घरी अगदी सामान्यपणे वाढलेले असल्यामुळे राजा म्हणून कसलेही लाड त्यांनी स्वतःचे पुरवून घेतले नाहीत आणि सामान्य माणसाशी नाळ कधीही तुटली नाही,त्यांनी ती तुटू दिली नाही.

सर्व आवराआवर झाल्यानंतर पुन्हा पुढील प्रवासाला सुरवात झाली आणि इतका वेळ मनात मागे पडलेला विचार पुन्हा पुढे आला आणि त्याने कृष्णाला पुन्हा चिंतेत पाडलं. श्रीहरी लीला करता करता आपल्याच मायेत अडकले आणि सुटण्याचा काही मार्ग आता तरी दिसत नाही. राधेला न भेटण्याच्या अपराधीपणाच्या भावात राधेच्या भेटीच्या वचनाचा बदल्यात राधेने मागीतलेलं भलतंच मागणं आणि आपण दिलेलं वचन यांच्या चिंतेत कृष्ण हरवून गेला. यात्रेच्या ओघात दादाच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही.

कृष्णाने तस कोणाला आपली मनःस्थिती कळणार नाही याची पुरेशी काळजी घेतली होती.  पण मनाच्या एका कोपऱ्यात खंत म्हणा, वैषम्य म्हणा, अपराधीपणाची टोचणी म्हणा अश्या मिश्र भावाचं आंदोलन मनात चालू होतं.  यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता , तो म्हणजे, राधेची भेट घेणं, तिला दिलेल्या वचनाची पूर्तता करणं. पण सध्या तरी निकटच्या काळात ते शक्यच नव्हतं. म्हणजेच याचा अर्थ मगाशी मुरली वाजवता वाजवता मनोवेगे कृष्ण राधेला भेटला आणि तिने त्याच्याकडे मागितलेले तीन सूर , भेट होई पर्यंत तिच्याकडे राहणार होते.

जगनियंत्याची सत्त्वपरीक्षा. वचनपूर्ती पर्यंत मुरलीवादन पूर्ण बंद. कारण तीन महत्वाचे सूर गंधार, पंचम आणि धैवत राधेकडे बद्ध राहणार. तस वचनच दिलंय हरीने राधेला.

कृष्ण कृष्ण राधा .

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...