Skip to main content

पाणी अर्थात जीवन

पाणी

जीवन ज्याला म्हटलं जातं आणि जे खरच तुमचं आमचं समस्त सजीव प्राण्यांचं जीवन आहे ते म्हणजे पाणी, जल, नीर , तोय, उदक, वॉटर, H2O.

तापलेल्या उन्हात तुम्ही घरी आला आहात वा कोणाच्यातरी घरी गेला आहात अथवा एखाद्या क्षुधाशांतिगृहात शिरून बसला आहात आणि समोर पाणी येतं. त्यावेळी सर्वसामान्य पणे आपण ग्लास उचलून ओठाना लावताना नकळत डोळे बंद करतो. करा निरीक्षण. कारण तो जो पहिला थेंब जिभेवर आणि जिभेवरून अन्ननलिकेद्वारे आधी घशात, मग घशातून थेट पोटात जातो, त्या पहिल्या थेंबाचा स्पर्श , आनंद, नाद, जाणीव, फील स्वर्गीय आनंद देतो.

इतका निर्मळ आनंद असतो तो की, त्याची तुलना कोणाशीही वा कशाशीही करता येणार नाही. म्हणून त्याला जीवन म्हणतात. जगण्यात आणि ग्रहण करण्यात एक आनंददायी रस निर्माण करणारं म्हणून जीवन. जगणं का आनंददायी आहे आणि का आनंदात जगावं याची अनुभूती तो पहिला थेंब देतो. त्या क्षणी पाण्याचं मोल कळत देहाला , जाणवतं मनाला आणि अनुभूत होतं आत्म्याला, म्हणून जीवन.

एरव्ही जेंव्हा आपण सर्वसामान्य परिस्थितीत पाणी पितो तेंव्हा त्याचं तितकंसं महत्व जाणवत नाही, कळत आहे, समजत नाही आणि समजलं तरी मान्य होत नाही.  म्हणूनही कदाचित जीवनात त्या उष्ण ऋतू सारखे कटू अनुभव व  वाईट दिवस येत असतील. जेणेकरून त्यानंतर येणाऱ्या सुखाच्या पावसाळ्यातील पहिल्या थेंबाचा आनंद घेता यावा आणि तो घेताना आधीचा उन्हाळा विसरावा , पण त्याच्या अनुभवाने आलेलं शहाणपण लक्षात ठेवावं आणि पुढे जीवनातील प्रत्येक उन्हाळ्यात तो सुसह्य होईल अशी मानसिकता ठेवून,  पुढील पहिल्या थेंबापर्यंत ती टिकवून ठेवावी. हाच धडा तो पहिला थेंब देतो, असा माझा अनुभव आहे, ज्यामुळे मी जगणं एक सुंदर पर्व आहे असं मानतो आणि प्रत्येक क्षण आनंद आणि आल्हाद.

© प्रसंन्नदायक आठवले
२३/०६/२०१८
०८:२७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...