Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २१

श्रीरुक्मिणी स्वयंवर २१ 

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 त्या मयुररंगी पत्रिकेत लिहिलेला प्रत्येक शब्द फक्त आणि फक्त प्रेमभाव प्रकटत होता. डोळ्यात प्राण आणून या क्षणांची प्रतीक्षा करत असलेल्या प्रियकरासम  अस्वस्थ यदुनाथ, चर्येवर भावविहिन दाखवण्याचा यत्न करत होते, तरी अंतर्यामी भावविभोर झाले होते. उत्सुकता आणि प्रेमपूर्वक, श्रीमाधवानी पत्रिका उलगडून सात श्लोकाच्या त्या पत्रिकेतील श्लोकरूपी प्रेमसंदेश व त्या संदेशामागील भाव  वाचण्यास व जाणण्यास   आरंभ केला. 

                        ll श्रीरुक्मण्युवाच ll

श्रुत्वा गुणान् भुवनसुंदर श्रुण्वंता ते निर्विश्य कर्णविवरर्हरतोsड्ःपांगम् ll

रूपं दृशां दृष्टीमतामखिलार्थलाभं त्वय्यच्चुताविशती चित्तमपत्रपं मे ll 

ओम नमोजी यदुनाथा. माझ्या मनःस्थितीचे वर्णन कवण प्रकारे करावे हे मला उमजत नाही. हे निर्विकारा तूच एक माझा आधार दिसतोस. तुला प्रेमभक्तीपूर्वक हे माझ्या मनीचे गुज कथन करते. जे वाचुन  सकळामाजी सर्वश्रेष्ठ सर्वनाथ त्वरेने मजपाशी येऊन मज आपल्या मंदिरी घेऊन आपल्या हृदयी स्थान द्यावे. माझे वडीलबंधु हे माझ्या इच्छेविरुद्ध आणि स्व:इच्छेनुसार माझा विवाह निचतम, अधमपती याजसोबत करण्याचे योजत आहे. आपण येऊन या अघोर प्रसंगातून माझी सोडवणूक करावी. 

हे त्रैलोक्यातील अत्यंत रूपवान पुरुषा, ज्याच्या सौन्दर्याने सुरवराना सौन्दर्यत्व प्राप्त होते वा लाभते असा तू एकमेवाद्वितीय आहेस.  तुझी नुसती कीर्ती ऐकून सकळ पापांचे निवारण होते. तुझ्याबद्दल नुसते ऐकले तरी त्या श्रवण भक्तीने श्रोत्यांचे मन निवारते, नव्हे तर त्रिविध तापांचेच हरण होते.  तुझ्या स्वरूपाचे प्रथम वर्णन जे ऐकले आहे , तेणे प्रमाणें , तुझ्या समुख चारी मुक्ती या लोळण घेतात, सर्व मोह , माया , लोभ आदी स्वार्थ चरणांवर लीन होतात. जो तुज देखतो त्यास इच्छित ते सर्व प्राप्त होते. अश्या प्राप्त सुखाना कधीही क्षय लागत नाही आणि म्हणून तू त्याकारणे अच्युत आहेस.  तुझ्या चरणी लागण्यास कितीही निलाजरेपणा करावा लागला तरी तो करावा, कारण जीवाचे इष्ट आणि इप्सित तेच आहे. 

का त्वां मुकुंदमहती कुलशीलविद्यावयोद्र्विणधाम भिरात्मतुल्यम ll

धिरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ll

मनाची अत्युच्च शांतता, विश्रांती जिथे लाभते असा तू आहेस. तुझ्या नामाकारणे वा तुझ्या नामाच्या बोधाने मनाला आनंद निजसुख प्राप्त होते आणि म्हणून त्याअर्थी तू मुकुंद आहेस. तू सकळ सुखांचा लाभ देणारा सर्व दुःख दैन्य यांचे हरण करून प्राणीमात्रांना कैवल्य सुखाची , आत्मसुखाची प्राप्ती करवून देणारा आहेस. तुला वरण्यासाठी या त्रैलोक्यात कोणती युवती नाही म्हणेल. 

हे माधवा तुझ्यापाशी कुळ,  शील, धन , रूप, विद्या आणि त्यात तुझं वयही सुयोग्यच आहे.  तू सुस्वरूपच आहेस , तुझी कांती तेजमय आहे, तुझ्या प्रभेचे वर्णन माया असल्यामुळे मला अशक्य आहे, यदुनाथा. तुझ्या प्राप्त होण्याने शांती लाभते. जी चितस्वरूप असते. तुला प्राप्त करण्यासाठी कित्येकजणी तप करत असतील. कितीक लावण्यवती, ऐश्वर्यवती, कित्येक सुस्वरूपिणी , कित्येक रूपवान युवती अश्याना देखील तुजसम वर प्राप्त होणे कठीण आहे. समस्त अवनीवरती तुझ्या सौन्दर्याने मोहित अगणित असतील ज्यांना देखील तुझी प्राप्ती अशक्य असेल, तिथे माझे काय होईल ही कल्पनादेखील करता येत नाही, अशी माझ्या मनाची अवस्था आहे. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१९/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...