Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६

llश्रीगणेशाय नमःll 

    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

 संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज यांच्या श्रीरुक्मिणी स्वयंवराच्या लिखाणाची गोडी, शब्दरचना, शब्दमाधुर्य, मांडणी, हे जणू कमळफुलातील मधुरस प्रत्यक्ष भ्रमराच्या रुपात नाथानी आपल्या हातावर द्यावा आणि तो मधुरस विरघळता विरघळत नाही आणि त्याची गोडीदेखील कमी होत नाही असा आहे.  जितका आस्वाद घेत जावा तितकी गोडी अजून अवीट होत जावी. 

नाथांच्या भारुडादी प्रकारात अध्यात्म ज्ञान देता देता नाथ, आसूड देखील ओढतात. पण श्रीरुक्मिणी स्वयंवरात त्याच नाथांच्या परिसस्पर्शी भाषेला केशरयुक्त ज्ञानामृत परिमळ मिश्रित, श्रद्धेचा स्वाद आहे आणि त्याचा आस्वाद घेणं ही अध्यात्म सुखाची परमावधीच आहे. म्हणजे शरदाच्या रुपेरी चांदण्यात चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव शर्करायुक्त क्षीर म्हणजे दूध पिण्यासारखं आहे. 

नाथांचं अंतिम उद्देश्य हे अध्यात्मिक ज्ञान प्रसारित करणं. त्याला भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या कथेचा किनारा म्हणजे फुलपाखराच्या पंखानी जग पाहणं.  बोध तो सुद्धा श्रीकृष्ण कथेच्या सुंदर माध्यमातून, हेच मुळात विलक्षण. पण एरव्ही अध्यात्मातील खाच खळगे स्पष्ट शब्दात सांगणारे नाथमहाराज श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी यांच्या लग्न कथेवर आधारित काव्यरसात्मक ग्रंथ लिहिताना नवरसांची बरसात करतात. माता शारदेच्या अनंत शब्दभांडारातून नेमके शब्द निवडून नाथमहाराज मांडतात 

आणि ते वाचताना आपल्याला जाणवतं की हे शब्द नाथांसमोर अक्षरशः हात जोडून ओळीने उभे आहेत. जणू त्यांच्यातच एक विलक्षण चढाओढ आहे की, नाथानी मला आधी निवडावं आणि प्रत्यक्ष परमेश्वर ज्यांच्या घरी पाणी भरत असे, ते नाथ प्रत्येक शब्दाला समजावून सांगतात, नव्हे आंजारून गोंजारून समजावतात बाबांनो प्रत्येकाला स्थान आहे या काव्यमय कथे मध्ये. प्रत्येक मृदू मुलायम, गोड शर्करायुक्त शब्दानो तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल न्याय मिळेल आणि तुमचा आबसुद्धा वृद्धिंगत होईल. 

नाथमहाराज म्हणजे कृपेचा सागर आणि प्रीतीचा अमृतकलश.  ते शब्दांची मांडणी अत्यंत सुयोग्यरित्या करतात. कारण ज्यांच्या शब्दसामर्थ्यापुढे देवी शारदा आणि श्रीगणेश स्वये येऊन उभे आहेत त्यांच्या लेखणीविषयी काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू हीच मुळात समस्या आहे. म्हणूनच अध्यात्मिक ज्ञानाच्या कोंदणातील व शारदीय मऊ मखमलीच्या वेष्टनातील नाथांचं श्रीरुक्मिणीस्वयंवर आख्यान आता अधिक विलंब न करता पुढील भागापासून सुरू करूया. 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०२/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...