Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५

llश्रीगणेशाय नमःll 

    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

आता नाथाना देखील काळजी वाटू लागली आणि त्यांनी निष्ठापूर्वक भगवंताचा धावा सुरू केला आणि काही क्षणात जगतपालक, महाविष्णुअवतारी, शंख चक्र गदाधारी पद्म पितांबर परिधान केलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण  प्रत्यक्ष नाथांच्या समोर गृहात प्रकट झाले.

नाथानी आणि विप्रवरानी प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातलं. भगवंतानी त्यांचे अश्रू पुसत दोघांनाही आपल्या जवळ घेतलं. अशक्यातलं शक्य होऊन समोर दृश्यमान स्वरूपात घडत होतं.

त्यावेळी नाथांच्या घरी उपस्थित असलेल्या लोकांच भाग्य थोर, ज्यांना प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन नाथांमुळे याची देही याची डोळा घडलं. भगवंतांना पाहून नाथ म्हणाले

"भगवंत आपण आमच्या घरी चाकरी केलीत आणि या पापाचे मला भागीदार केलेत. "

भगवन्त म्हणाले

" एकनाथ महाराज आपणच आम्हास  आपल्या चाकरीचा लाभ फार काळ लाभू दिला नाहीत. या गोष्टीची कायम स्वरूपी खंत मात्र राहील आम्हास."

नाथ आणि विप्रवर हात जोडून  म्हणाले

" भगवंता पण आपल्याला श्रीखंड्याच्या रुपात बघण्याची इच्छा आहे. तेवढी इच्छा पुरवा."

हे दोघेही बोलले मात्र भगवंत त्वरित श्रीखंड्याच्या रुपात प्रकट झाले. आपल्या लाडक्या श्रीखंड्याला पाहून नाथाना आणि विप्रवराला अत्यानंद झाला. नाथ श्रीखंडयाना म्हणाले

" अरे श्रीखंड्या  बारा वर्षांपूर्वी आलास तेंव्हा बटू होतास आणि आता तुझं लग्न करण्याचा घाट घालणार होतो आम्ही. ती संधी आमच्या हातून हिरावून घेतलीस."

भगवंत यावर बोलले

" लग्न, नाथ माझी अनेक लग्न झालीत अनेक जन्मात. जर करायचंच असेल तर माझ्या एखाद्या लग्नावर एखाद काव्य लिहा. जे वाचून अनेक पिढयांच कल्याण होईल."

एवढं बोलून भगवंत अंतर्धान पावले.

अस म्हणतात की भगवंताच्या आज्ञेवरून नाथानी श्रीरुक्मिणीस्वयंवर हा काव्यग्रंथ लिहिला.  या काव्यरूप ग्रंथात नाथानी भक्तीरसाची, आत्मरूपाची सुरेख शब्दात मांडणी केली आहे. ज्याच्या पठणाने आणि चिंतनाने जन्मजन्मीचे दोष व पाप यातून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या सर्वांचा विचार करून पुढील भागापासून विस्ताराने नाथानी मांडलेलं श्रीरुक्मिणीस्वयंवर काव्य, गद्यरूपात व माझ्या शैलीत, माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि स्वतः श्रीएकनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने प्रस्तुत करण्याचा मनोदय आहे.  यासर्व थोर व्यक्तींबरोबरच वाचकांच्या सदिच्छाही सोबत असतील याची मला खात्री आहे.

त्यामुळे पुढील भागापासून आनंद घेऊया श्रीनाथमहाराज विरचित श्रीरुक्मिणीस्वयंवर या अलौकिक काव्यसुमनातील प्रत्येक पाकळीचा, प्रत्येक परागाचा आणि त्यातील अद्भुत सुगंधाचा.

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०१/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...