Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २२

श्रीरुक्मिणी स्वयंवर २२

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 समस्त अवनीवरती तुझ्या सौन्दर्याने मोहित अगणित असतील ज्यांना देखील तुझी प्राप्ती अशक्य असेल, तिथे माझे काय होईल ही कल्पनादेखील करता येत नाही, अशी माझ्या मनाची अवस्था आहे.  हे नरवीरपंचानना प्राप्त काळी तुझ्यासारख्या वराला कोणती वधू वरणार नाही. हे मनमोहन श्रीकृष्णां तू म्हणशील मी ना तुला जाणतो ना तुझा सोयरा आहे. त्यातून मी काळासावळा सुद्धा आहे. मला तू विवाहाला बोलावत आहेस की काय. इतका मोठा विवाहसोहळा जमविला आहे. यास्तव मी यावे असेतर तू आमंत्रण देत नाहीस ना अशी शंका तुजप्रत आली आहे का?. 

अशी कोणतीही शंका घेऊ नकोस. मला आजच्या घडीला शिशुपाल, ज्याच्याशी बळजोरीने विवाहित करण्यात येत आहे, तोच,  काळासम भासत आहे. त्याच्याशी विवाह हा सर्वस्वी माझ्या इच्छेविरुद्ध आहे हे प्रथमतः जाणून घे. त्यामुळे अधिक विलंब व विचार न करता तू यावेस आणि मला वरून घेऊन जावेस हीच माझी इच्छा आहे. माझी वा माझ्या , तुला वरण्याच्या इच्छेची, उपेक्षा न करता तू यावेस हाच आर्जव आहे.

तन्मे भवान् खलू वृत्त: पतिरंsड्ः जायामात्मार्पितस्य भवोsत्र विभो विधेही ll

मा विरभागमभिमशर्तु चैद्य आराद् गोमायुवनमृगपतेर्बलितमं बुजाक्ष ll ३ ll

हे यदुनाथ , मी तन मन आणि काया यामार्गे तुला आधीच पती म्हणून वरले आहे , तुला मात्र येऊन विवाहविधी संपन्न करण्याचे आहे. तेवढे कार्य,  तू येऊन,  करावेस अशी इच्छा मी व्यक्त करते. माझा तुलाच वरण्याचा हा निर्धार दृढ नव्हे तर काळाच्याही पार आहे. तू म्हणशील की माझा प्रकृतीधर्म व स्वभाव हा भिन्न आहे आणि मला स्त्रियांची संगती भावत नाही. असे कथुन तू जर मला अव्हेरलेस तर ते तुझ्याच शरणरक्षक ब्रिदाची तूच केलेली थोर अवहेलना व चेष्टा ठरेल. 

हे श्रीकृष्णां मी तुझेच अर्धे अंग अर्थात अर्धांग आहे आणि त्याअर्थी मी तुझी अर्धांगी आहेच. अश्या स्थितीत आणि स्वये श्रीरंग म्हणजेच तू माझे दुसरे वीरअंग असताना, शिशुपाल या देहाला शिवू शकेल हे कल्पनातीत आहे, नव्हे तर त्रिवार अशक्य आहे. 

तूच माझ्या सकलशिराच्या रक्षणासाठी सर्वथैव सिद्ध असताना आणि तो भार तूच शिरावर घेतला असताना माझ्याशी दुसरे कोणी विवाहाची कल्पना करूच कशी शकतो. मी तुझीच, सर्वस्वी मात्र तुझीच, आहे. अर्थात या तुझ्या प्रीतीला, चेतीराज शिशुपाल स्वहस्ते घेऊन जाईल, ही , हे कमलनयन , चतुर्भुज, पद्म गदा शंख धारी तुझीच अपकीर्ती असेल. 

हे नरश्रेष्ठा , तूच माझे रक्षण करण्याची आपली कीर्ती राखविस, यातच समस्तांचे कल्याण आहे. हाच धर्म आहे. हीच काळाचीही सदिच्छा आहे. तू येऊन फक्त तुझे कर्तव्यकार्य करावेस हेच मला वाटते. कारण ज्या स्त्रीने एकदा कोणास वरले तिला दुसरा कोणी वरू धजणे हाच अधर्म असेल. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२०/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...