Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४

llश्रीगणेशाय नमःll 
    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

 विप्रवर मदनराव शर्माआणि नाथमहाराज दोघेही साश्रु अवस्थेत आहेत. समस्त अतिथीवृंद आणि घरातील मंडळी जमा झालीत. विप्रवर सांगत आहेत.

" मी मूळ महाराष्ट्र प्रांतातील, वऱ्हाड मधील ब्राम्हण आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाची आस मला द्वारकेत घेऊन गेली. तिथे काही काळ राहिल्यानंतर मी श्रीकृष्ण दर्शनासाठी अंतःप्रेरणेने बारा वर्षे उग्र तपःसाधना केली. बारा वर्षे सरली आणि काही काळापूर्वी माता रुक्मिणी यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि आज्ञा केली की, भगवंत श्रीखंड्याच्या रुपात, श्रीएकनाथ महाराजांकडे, एक तप लोटलं वास्तव्य करून आहेत. तू त्यांच्याकडे जा तुला श्रेकृष्णांच दर्शन होईल."

हे ऐकलं मात्र नाथानी टाहो फोडला. अक्षरशः हंबरडा फोडला आणि नाथमहाराज लहान मुलाप्रमाणे रडू लागले. हे पाहून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर नेत्रातील अश्रूंनी पूर काढला. नाथांना विप्रवर म्हणाले

" पण आपण का दुःखी होताय. आपण तर माता रुक्मिणीहून भाग्यवंत आहात. एक तप भगवन्त आपल्या गृही पाणक्याचं काम करत आहेत."

यावर नाथ अजूनच अश्रू ढाळत जड आवाजात म्हणाले

"माझ्या इतका निष्ठुर जीव या जगात सापडणार नाही. प्रत्यक्ष परमपिता , विश्वाचा मालक , जगतचालक, माझं आराध्य,  भगवान श्रीकृष्ण माझ्या घरी होते उणेपूरे बारा वर्षे आणि मी पामराने त्यांच्याकडून पाणी भरून घेतलं.  या पापाला अनंत काळापर्यंत क्षमा नाही."

त्यांचे हे दुःखपूर्ण आणि पश्चात्तापदग्ध उद्गार ऐकून विप्रवर नाथांना म्हणाले

"नाथमहाराज यात आपली काय चूक. आपल्याला काय माहीत की श्रीखंड्या म्हणजेच भगवंत स्वतः आहेत. जर आपण जाणत असतात तर नक्कीच हे नसत घडलं. म्हणून आपण त्रास करून घेऊ नये. पण श्रीखंड्या आहे कुठे."

आता नाथाना देखील काळजी वाटू लागली आणि त्यांनी निष्ठापूर्वक भगवंताचा धावा सुरू केला आणि काही क्षणात जगतपालक, महाविष्णुअवतारी, शंख चक्र गदाधारी पद्म पितांबर परिधान केलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण  प्रत्यक्ष नाथांच्या समोर गृहात प्रकट झाले.

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

३०/११/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...