Skip to main content

राजकीय प्रहसन.



राजकीय प्रहसन.

पडदा उघडतो.

प्रधानजी : राज्याच्या महाराजांचा विजय असो.
 राजा : ते राहू दे काय खबर आहे राज्याची.
प्रधानजी : महाराज आपल्या राज्याभिषेकाचा उदो उदो होतोय सगळीकडे आणि आपली डावपेचांचीच चर्चा चालली आहे सर्वत्र. सर्व प्रेस आणि रेपोर्टर्स आपल्या आपल्या वर्तमानपत्रात  आणि चॅनेल्स वर चाणक्य कोण यावर चर्चा करत आहे.
राजा : बर  मग.
प्रधानजी :  काही आगाऊ माझं नाव पुढे करत आहेत. त्यांना दमच दिला हा सर्व प्लॅन आणि अंमलबजावणी राजांच्याच हुकुमाने आणि संमतीने पार पडलं. माझा सहभाग फक्त अंमलबजावणी चोख करण्यापुरता.
राजा : अलबत कोणास काही शक.
प्रधानजी : नाही कोणासही नाही अगदी आम्हासही नाही
राजा: बर ते सोडा
प्रधानजी : महाराज आता या वेळी सोडा पोट तर ठीक आहे ना आपलं. कि .........
राजा : खामोश ते सोडा म्हणजे ते राहू द्या. समजत नाही असो आपले मित्र काका काय म्हणतायत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांची काय खबर आणि दिल्लीच्या मॅडमचा काय बेत आहे विस्ताराबाबत.
प्रधानजी : महाराज त्यांचं आपापल्या पक्षात त्यांचं ठरत नाहीये कोणी कोणती खाती घ्यायची. सर्व महत्वाची खाती दोन्ही पक्षांना हवी आहे. याउप्पर त्यांच्या पक्षात सुद्धा महत्वाच्या खात्यांवरून सुंदोपसुंदी सुरु असलेल्याच कळत. याशिवाय पुतणे आताच दोषमुक्त झाल्याचं जाहीर झालंय  त्यामुळे तेही कामाला लागलेत, मंत्रिमंडळात येण्याच्या आणि महत्वाच्या खात्यावर घुसण्याच्या.
राजा : हे सर्व माहित आहे आम्हाला. जे माहित नाही त्याची खबर द्या. या सर्व भानगडीत मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळ्यातील अधिवेशन देखील आहे त्या मंत्र्यांना घेऊन पार पाडाव लागणार. विरोधक तर वाट बघत आहेत या सर्व गोष्टींची. कस करावं हेच कळत नाही.
प्रधानजी : राजांकडे तर सर्व खबरा आहेत. फार लवकर पिक अप  केलत. म्हणजे तयार झालात.
राजा : भानावर आहात का ? हे सर्व आमच्या रक्तातच आहे. खानदानी  आहे उपजत आहे पिक अपचा प्रश्न येतोच कुठे.
प्रधानजी : तेच म्हणायचं होतं कि, आपले उपजत गुण लवकर काम करायला लागले. आणि काका मावशी यांचं काही लवकर जमेल असं वाटत नाही म्हणजे एकमत होईल असं वाटत नाही.
राजा : हो पण तोपर्यंत आमची खुर्ची अधांतरीच ना !
प्रधानजी : हो संध्या तरी. तसच. बघूया.
राजा : वाट बघण्याशिवाय काही दुसरं करू शकतो.
प्रधानजी : महाराज आपण तोपर्यंत घोषणा देऊ शकतो.
राजा : कसल्या घोषणा देऊ शकतो. शुद्धीत आहात का? आपल्याला त्याचा अधिकार आहे का ? वरून काही आल्याशिवाय आपण श्वास घेतोय हेच खूप आहे.
प्रधानजी : हो तेही खरच  म्हणा.
राजा : मग काय करावं आम्ही
प्रधानजी : तोपर्यंत एक करू शकतो
राजा : काय
प्रधानजी : आधीच्या राजाने जाहीर केलेल्या व सुरु असलेल्या दोन्ही प्रकारच्या योजना सध्या स्थगित करू शकतो.
राजा : त्याने काय होईल  ?
प्रधानजी : तीन काम होतील
राजा : कोणती ?
प्रधानजी : एक म्हणजे आपले सैनिक खुश होतील  स्थगितीच्या घोषणामुळे  त्यांना सोशल मीडियावर काही तरी काम मिळेल.
राजा : का ?
प्रधानजी : अहो महाराज राज्याभिषेकाचा आनंद सोडला तर बाकी काही हाती आपलं नाहीये अजून त्यांच्या नशिबात.
राजा : नंबर दोन
प्रधानजी : नंबर दोन राजकुमार आपले.
राजा : नंबर दोन काम काय होईल. कुठे आहात कुठे. इथे कि काकांच्या सदनी.
प्रधानजी : क्षमस्व नंबर दोन काका व मावशींवर थोडं इम्प्रेशन पडेल, जुन्या योजनांची आपण वाट लावतो आहे वा स्थगिती देत आहोत म्हणून.
राजा : पुढे
प्रधानजी : पुढे त्यांच्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा अजून पुढे सरकतील.
राजा : अहो पुढे म्हणजे  तिसरं काम काय होईल.
प्रधानजी : त्यावरच येत होतो मी, मीडियालासुद्धा काही काम मिळेल.
राजा : मग तोपर्यंत आम्ही काय करायचं.
प्रधानजी : मी काकांना चुचकारतो आपण मावशींची मनधरणी करा.
राजा रागाने प्रधानजीकडे बघतात आणि पडदा पडतो.





















 














Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...