Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २८

श्रीरुक्मिणी स्वयंवर २८ ( चतुर्थ प्रसंग समाप्त) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
काळा धाड तीज त्वरे हा संदेश 
वरण्यास तिला येतोय द्वारकेश

रुक्मिणीच्या पत्रिकेतील भावार्थ हा इतका खोलवर गेला होता की श्रीकृष्ण , प्रत्यक्ष द्वारकाधीश , सुदबुध हरवून बसले होते. शयनमंचकावर पहुडले तर होते, परंतु कुशी बदलून बघत होते, उठून बसत होते, मंचकावरून खाली उतरून येरझाऱ्या घालत होते. पुन्हा निजत होते. मोठी विचित्र भावावस्था झाली होती यदुवीरांची. 

न बैसवे कोठे, न निजावे वाटे
अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे

तरंग उठले जे  वायूने 
ते ते श्रीहरीच्या प्रेमाने
वायूही सांगे आनंदाने
पोचवा रे ते रुक्मिणीप्रत सारे
अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे

निजली अवनी अन आकाश
निजले विश्व अन रवीप्रकाश
निजले द्विजवरही सावकाश
श्रीहरीसी का न जमे  निजणे 
अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे

वाहे चिंता विश्वाची जरी
कैसी स्थिती प्रेमे भीतरी
भक्त हृदयी असून श्रीहरी
श्रीकृष्ण जागतो, उमेश पाहे
अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे

विश्वाची चिंता वाहणारा आज रुक्मिणीच्या चिंतेने चिंतातूर झाला होता. अष्ट दिशांना , अष्ट वसूना नियंत्रित करणारा आत्मतेजोमय स्वप्रकाशी आज भावमय झाला होता. रुक्मिणीला मनातून क्षणोक्षणी समजावत होता, रुक्मिणी देह त्यागू नकोस, मी , श्रीकृष्ण , द्वारकाधीश , येत आहे तुला वरण्या. परंतु हे अर्थातच स्वमनाला समजावत होता, जे मन आज, जितेंद्रिय असलेल्या यदुवीरांचे राहिलेच नव्हते. 

अर्थात त्यात तथ्यांश आहेच कारण , जगदीश्वराचे ब्रीद , जैसा भाव तैसा देव. भीमकीची भावपूजा अर्थात तन मन आत्मा हरीला अर्पून स्व विसरून हरीचरणी रत झाली होती. हरीला मनाने वरलेल्या रुक्मिणीला तिच्या प्रेमरूप भक्तीचा प्रसाद हरिरुप , हरिचैतन्य प्राप्त करून देत होते. 

रुक्मिणी हृदयी श्रीकृष्ण 
कृष्ण हृदयी रुक्मिणी वसे
प्रेम भक्तीचे स्वरूपी तीज
कृष्ण प्रेम प्राप्त होतसे. 

हृदयीच्या या सार्थ भावाला प्रतिसाद हरीचे हृदय देत होते. भक्तांहृदयी असणारा श्रीकृष्ण आज आपल्याच हृदयीच्या मनोवस्थेत पाहून परम ईश्वर ब्रम्हदेव व सांब सदाशिव सपत्नीक विस्मयीत झाले होते. देव भावाचा भुकेला आहे. परंतु आज भाव देवाला वेढून दशांगुळे उरला होता. मोठी विचित्र स्थिती झाली आणि याच स्थितीत रात्र सरत ब्रह्ममुहूर्त आला. द्विजास उठवून श्रीहरीने रात्रीचा वृत्तांत, आपल्या मनाची स्थिती आणि आपला निश्चयात्म निर्णय कथन केला. अर्थात श्रीकृष्ण आनंदाने हर्षाने टाळ्या पिटुन पिटुन आपली मनोवस्था द्विजास कथन करत होता. द्विज अर्थात हे सर्व पाहून हर्षोल्हासित झाला. वायूवेगे वायूचे अनुरेणू धावू लागले जणू निरोप घेऊन की, श्रीकृष्ण चालले विदर्भात रुक्मिणी पाणिग्रहण करण्यास. भक्ताने सदभावाने घातलेली साद त्याच भावात श्रीहरिपर्यंत पोहोचते हे ब्रीद राखण्यासाठी हरी निघाले. 

वाचकजनहो या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथमहाराज यांच्या कृपेने चतुर्थ प्रसंग समाप्ती होत आहे 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२७/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...