Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १३

श्रीरुक्मिणी स्वयंवर १३ 

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
आतापर्यंत आपण श्रीकृष्णाची स्तुती वाचली,  आता रुक्मिच्या विचारांची स्थिती पाहूया. पिताश्री भीमक यांच्या श्रीकृष्णाशी सोयरीक जोडण्याच्या विचारांवर घणाघात करत रुक्मि वदतो

श्रीकृष्णाशी शरीरसंबन्ध तोदेखील भगिनी रुक्मिणीचा. पिताश्री आपण या वयात काय चालवले आहे. म्हातारपणाचे छंद म्हणून सोडून देखील देता येत नाही. कारण रुक्मिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बर हा तुमचा श्रीकृष्ण तरी कोण आणि कसा? अहो ज्याने आपला सख्खा मामा मारला तो तुम्हा आम्हाला काय धड वागवणार. कोणी म्हणतात की हा नंदाचा तर कोणी म्हणतात की हा वसुदेवाचा पुत्र. म्हणजेच ज्याच्या पित्याचाही ठाव नाही अश्याशी सोयरीक हा विचारच अतर्क्य वाटतो मला. 

पिताश्री याच्या कुळ गोत्र आणि जन्मपत्र यांचा देखील ठाव  नाही, हा स्वतः स्वतंत्र कुठे आहे हा तर भक्तांवर अवलंबून म्हणजे परतंत्रच ना. बर ह्याचं कर्तृत्व तरी काय, सदोदित परद्वारी पडलेला, गोरसचोरी हेच याच कर्म , एक कार्य धड नाही सर्व धरसोड याचं , त्यात चित्ताची चोरी हे पण एक कार्य आहे याच्या नावावर. गायींपाठी धावता धावता पळण्याची कला जमली, ज्यामुळे कालयावनापुढे धावता धावता कर्मधर्म संयोगाने मुचकुंद ऋषींचे रक्षण करता झाला. इतकंच. अहो याला कसा वीर योद्धा म्हणायचं जरासंधाला भिऊन जो समुद्रतटी नवीन नगरी वसवून मथुरा गोकुळ हे आपलं जन्मस्थळ सोडून पळाला. 

अहो केशिया मारला गेला आपल्या मरणाने, बैल मारला संकट ओढवून घेतलेलं म्हणून, यावरच वीर ठरवायचं का याला. वत्सासुर म्हणून वासरू मारलं, बकासुर म्हणून एक पाखरू मारलं आणि अघासुर म्हणून एक किरडू मारलं याने. 

 या कृष्णाने कधीही कोणती गोष्ट उघडपणे केली सांगा मला. हा लपण्यात चतुर आणि हुशार आहे. आता त्याची लपण्याची स्थानं तरी ऐका.  वैकुंठाच्या पहाडावर बसायचं किंवा क्षीरसागरात बुडी मारून राहायचं किंवा निद्रेच्या मिषाने शेषाच्या फण्यावरती चढून बसायचं. अहो विघ्न पाहताच हा मत्स्य किंवा सुकर अर्थात वराह व्हायचा किंवा पाठ टणक करून कमठाचे अर्थात कासव रूप घ्यायचा.  

हा भारीतला भारी दैत्य पाहून खांबात दडून बसला आणि गुर गुर करायला लागला.  बळे बळे बाहेर काढला तर नरसिंह रूप घेतलं. अहो बलवान दैत्य पाहून हा भिकारी झाला पण त्याच बळीने याला बांधून आपलाच द्वारपाल केला.  सर्व मायेचा खेळ आहे. ऋषींचे रूप धारण करून आपणच सर्व दैत्यांशी वैर धरलं, इंद्राच्या गाईचं रक्षण करण्याचं वचन दिलं. त्याच दैत्यांनी याची माय मारली मग लागला हा रडायला. त्यानंतर काय केलं ते ऐका. आपणच दुर्लक्ष करून पत्नी घालवली, नन्तर काही वानरे जमवून तिला मिळवली आणि वर श्रेय देखील आपणच घेतले. आता या जन्मांतच बघा. गवळ्यांपुढे नाचगाणं करणं हाच याचा छंद. 
 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०९/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...