Skip to main content

अध्यात्म विराम ९३

अध्यात्म विराम ९३

सखा या शब्दाचा अजून एक सुंदर अर्थ आहे, तो म्हणजे हितेशी, हित जाणणारा, हित जपणारा, हिताचं रक्षण करणार, हितार्थ उपदेश, कृती व कार्य करणारा. अर्थात हा अर्थ नाण्याच्या दोन बाजूंसारखा आहे. म्हणजे असं की, मी माझ्या मित्राच्या हिताचं, त्याच्या भल्याचं पाहीन, त्याचं संरक्षण करीन, त्याचप्रमाणे त्यानेसुद्धा माझ्या हिताची गोष्ट, कृती करणं अपेक्षित आहे. हे हित पाहणं आणि त्या हिताचं रक्षण करणं अनेक अर्थाने आहे. त्याचा सखोल विचार करूया. हित या शब्दाचा आधी आपण विचार करूया. म्हणजे खरा सखा कोणाला म्हणायचं याचा अर्थ बोध होईल. 

हित या शब्दाचे अनेक अर्थ, प्रसंगानुरूप सापडतात. पण खरा अर्थ तोच आहे,ज्यामधे खरं हित दडलेलं आहे. हित म्हणजे लाभ, फायदा हा वरवरचा अर्थ झाला. पण वास्तविक अर्थ आहे कल्याण, मंगल, कुशल किंवा well being. पाहणे. हा खूप व्यापक आणि गहन अर्थ असलेला शब्द आहे. मी एखादी चुकीची बेकायदेशीर, अनैतिक गोष्ट करत असताना, एखादा मित्र मला, त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तर, तो साथीदार नक्की असेल पण हितेशी नाही. कारण मी असं काम न करण्यासाठी प्रयत्न करणारा, त्यासाठी योग्य सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन व प्रसंगी रागावणे, हे करणारा खरा हितदर्शी व पथदर्शी सखा असतो. 

जो खरा सखा नाही, तो ऐकेल आणि सोडून देईल. मी अश्या कार्यात अडकलो किंवा दंडित झालो तरी, अश्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही. म्हणजेच तो खरा हितेशी नाही. हित पाहणे म्हणजे कल्याण इच्छिणे, मंगल कामना करणे आणि खऱ्या अर्थाने भलं होईल याचाच विचार व कृती करणे. म्हणजे मी एखाद्या बद्दल चांगला विचार करतो, त्यामुळे मी हितेशि किंवा सखा होईन का. तर नाही. कारण हित पाहणारा म्हणजे फक्त विचार करणारा नव्हे, तर आपला सखा चुकत असेल, मार्ग भ्रष्ट होत असेल तर त्याला योग्य मार्गाला आणण्यासाठी प्रत्यक्ष कृती करतो, तोच खरा सखा. 

यासाठी एक सर्वोत्तम नावं म्हणजे कृष्ण व अर्जुन. प्रत्यक्ष महाभारत युद्ध प्रसंगी, ज्यावेळी,आपला सखा असलेला, अर्जूनासारखा महारथी योद्धा, चुकीचा विचार व कृती करत होता. त्यावेळी त्याचा हितेशी म्हणून जगातील, वेदातील सर्वोच्च ज्ञान देऊन, विराटरुप व विश्वरुप दर्शन देऊन, त्याला योग्य मार्ग सांगितला. नुसताच मार्ग सांगितला नाही तर, धर्माविरुद्ध अधर्म अश्या या युद्धात, दुष्ट शक्तींना मारण्यासाठी, कूटनीतीचा वापर करून, जगताच्या अंतापर्यंत केला जाणारा,चुकीच्या पद्धतीने युद्ध खेळल्याचा आरोप स्वतःवर घेतला. पण अर्जुनाच्या हिताचं रक्षण, कल्याण व मंगल होईल हे पाहिलं. 

ते तसं मंगल साध्य होण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची मानसिक तयारी, त्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याची हिम्मत दाखवुन, धर्म मार्गी सखा अर्जुन याचं हितरक्षण करून, सखा म्हणून युगानुयुगांसाठी एक उत्तम आदर्श, सखा म्हणून घालून दिला, त्याला तोड नाही. 

सखा व हित यावर अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत आपल हितरक्षण करणारा ईश्वर, त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...