Skip to main content

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ६ समाप्त

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ६ समाप्त

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
 
वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ज्ञानमय आणि विज्ञानमय ही श्रीगमेशाच्या कोषातील अनेक प्रकट रुपांपैकी काही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की, प्रकट रुपांपैकी जी विश्व व्यापून आहेत, ती श्रीगणेशाची रुपं, इतकी मोहक, आनंद दायी, विश्वव्यापक, प्रफुल्लित, विलोभनीय आणि स्वयंनिर्मित  आहेत की, अप्रकट गुण किती अद्भुत असतील, हे अवर्णनीय आहे.

कदाचित या समस्त विश्वाबाहेर, जर खरच अजून काही लोक जसं भुवर, भुव, स्वरलोक अर्थात स्वर्गलोक, यांसह ओंकारात समाविष्ट समस्त ब्रह्मांडच नव्हे तर, मारुती स्तोत्रात समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अनेक ब्रह्मांडे असतील, 
तर त्यात असलेलं,  परंतु आपण कधीही न पाहिलेलं आणि पाहू न शकणारं सर्व जगत किती सुरेख असेल, याची कल्पना, फक्त पृथ्वी या एका ग्रहावरील अद्भुत सृष्टीने व आनंद, नाद, शब्द, स्वर, लहरी, तरंग यांच्या सौन्दर्याने नटलेली वसुंधरा पाहून येऊच शकते. 

अश्या या चराचर व्यापून उरलेल्या श्रीगणेशाला ब्रह्ममय का म्हणतात, याची, आपण आपल्या मर्यादित बुद्धीच्या कक्षेतून, खरतर, कल्पनाच करू शकत नाही. कारण  समस्त ग्रहमंडल, तारे, अगणित आणि असंख्य सूर्य व सूर्यमाला यांचा रचयिता असलेला आणि या ब्रह्मांडाहून भिन्न तरीही ब्रह्मांडापार असलेला, हा आदीदेव श्रीगणेश, ब्रम्ह आणि त्याच्या पासून अंड अर्थात कोशात असणारं विश्व, यांना सामावून आहे. यावरून त्याच्या शक्तीची, रूपाची, अस्तित्वाची, व्यापकतेची, व्यक्तित्वाची ओळख होऊ शकेल.

इतका विराट, अजस्त्र रूप, गुण असलेला हा श्रीगणेश, तरीही आपल्या भक्तांच्या देहातील, इवल्याश्या हृदयात नित्य विराजमान असतो.  म्हणजे ब्रम्ह तोच, ब्रह्मांड तोच, चराचर तोच, जीव निर्जीव तोच, या विश्वातील समस्त चेतनांच चैतन्य तोच आणि इतकं ब्रम्हरुप असून सुदधा अणुहून लहान होऊन भक्तहृदयी तोच, हे अजब कोडं खरतर बुद्धीच्याही पलीकडील आहे. 

तरीसुदधा आपल्या शक्तीने भक्तांना बुद्धीचं बल देऊन, या सर्वांचं आकलन करण्याचं सामर्थ्य, तोच देतो. म्हणजे व्याप्त तोच होतो आणि त्या व्याप्ततेची व्याख्या, आकार, प्रकटता, आपल्या भक्तांच्या अल्पबुद्धीला समजावं म्हणून, अतिविशाल मूळरूप त्यागून सुक्ष्मतेहून सूक्ष्म होऊन चर्मचक्षु आणि देहबुद्धीच्या कक्षेत येण्याची किमया तोच साधतो. 

तोच भक्तांच्या मुलाधारी  स्थित होण्याइतका अणूरूप होऊ शकतो. इतकी ज्याच्या हृदयाची विशालता आहे की, भक्त याच्या हृदयी आणि भक्तांच्या हृदयी हा असा आई मुलाच्या नात्याचा हा चमत्कार श्रीगणेशच करू जाणे.

म्हणूनच या ब्रम्हव्याप्त आणि ब्रम्हमय स्वरूपातील श्रीगणेशाला माझा सदैव साष्टांग प्रणिपात असो. 

इथे या एका श्लोकावरील विस्तृत विवेचन सहाव्या भागात समाप्त होत आहे. 

जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏

©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...