आयुष्य आहे फुलवावयाचे
तळ्यातल्या कमळाप्रमाणे
आयुष्य आहे फुलवावयाचे
जगणे हवे पाकळ्यांप्रमाणे
क्षण भ्रमराचे अडकवायचे
उल्हासित क्षण माना आपुले
त्यांच्यासवे जग जगावायचे
जखमा घाव सोडून द्यावे
दुःखाचे क्षण सोडवायचे
आयुष्य आहे फुलवावयाचे
भिंतीवरीच्या दिनदर्शिकेसम
गेले दिन ना आठवावायचे
येणारे दिन येतील येतील
आताचे क्षण जगावयाचे
आयुष्य आहे फुलवावयाचे
मिळतील जितुके क्षण क्षण
आयुष्य जगणे त्या क्षणांचे
फुलतील पाकळ्या मनाच्या
त्यांनाही फुकुनी द्यावयाचे
आयुष्य आहे फुलवावयाचे
उपकार नाही उपचार नाही
दिले आयुष्य साधावयाचे
जोडून मन नित्य निरंतर
मनास कोमेजून न द्यायचे
आयुष्य आहे फुलवावयाचे
उरतील शेवटच्या क्षणाला
आठव सुख समाधानाचे
इतुके जमले तरीही आपण
बांधले सुत हे जगावयाचे
आयुष्य आहे फुलवावयाचे
©® कवी : प्रसन्न आठवले
२७/१२/२०२०
०८:४१
Comments
Post a Comment