Skip to main content

भोग आणि ईश्वर १८


भोग आणि ईश्वर  १८
 
मी खुप वेळा मनात चिंतन करत असताना काही गोष्टी ठळकपणे दिसतात. त्यातून एक संकल्पना मला जाणवते. त्यातून जे चित्र बुद्धीला व मनाला दिसतं ते खाली मांडण्याचा प्रयत्न करतो. या आधी कोणी हे मांडलंय की नाही ते माहीत नाही पण मला ते जसं दिसतंय तसं सांगण्याचा हा प्रयत्न.

मानवी शरीर हे मुळात एक यंत्र आहे, अगदी रोबोप्रमाणे.  त्यात मेंदू हे आज्ञा देणं आणि स्वीकारणं यासाठी बसवलेला एक संगणक आहे.  त्याला आज्ञाप्रणाली अर्थात प्रोग्रॅम देण्याचं कार्य मन करतं. आत्मा या यंत्रमानवाचा ऊर्जा स्रोत अर्थात पॉवर स्टेशन आहे, जे अखंड या यंत्राला ऊर्जा पुरवत राहतं. 

हे यंत्र स्वयंचलित , स्वनिर्धारीत असून त्यातील अनेक प्रकारची  इंद्रिय, अवयव यांचा उत्तम मेळ जमवून या यंत्राला पृथ्वीसारख्या एका ग्रहावर पाठवून विधात्याने (अर्थात या यंत्राच्या निर्मात्याने) अनेक गोष्टी त्याद्वारे करवून घेण्यासाठी एक प्रयोगशाळा उघडली असावी. एखाद्या तारविरहित भ्रमणध्वनीप्रमाणे  बाहेरून येणाऱ्या व आतून येणाऱ्या सर्व सांकेतिक आज्ञा ग्रहण पृथक्करण करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीची सर्व व्यवस्था या यंत्राला देण्यात करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही गोष्टीसाठी निर्मात्याकडे यायची गरज पडता कामा नये. 

एखाद्या अद्ययावत संगणक प्रणाली प्रमाणे प्रणाली या यंत्रात अश्या प्रकारे बसवून ठेवण्यात आली आहे की, ज्या प्रकारे हे यंत्र ठरवेल त्याप्रकारे त्या यंत्राला वागू देण्याची मुभा निर्मात्याने दिली आहे. त्याशिवाय ज्या जगात आपण जातो ते जग समजून घेण्याची व्यवस्था मनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या भावभावना, विचार, ऐकलेल्या वाचलेल्या पाहिलेल्या सर्व गोष्टी, आवाज, चित्र जाणून समजून घेण्याची कुवत बुद्धिरुप स्वयंव्यवस्थेत केली आहे. 

यात हे यंत्र ज्याप्रकारे कार्य करेल, त्याप्रकारे त्या यंत्राला, प्रतिक्रिया व प्रतिसाद, कर्म जसे घडले असेल त्याप्रमाणेच, मिळण्याची व्यवस्था, तीसुद्धा  याच स्वयंचलित आज्ञा प्रणालीचा भाग आहे. जेणेकरून हे यंत्र जे करेल तेच त्याला परत मिळेल. या यंत्राला भावभावना देऊन देवाने एक अद्भुत गोष्ट केली आहे. 

ज्या बुद्धी, भाव, मन, मस्तिष्क, विचार या सर्वांच्या बळावर आजवर माणसाने, यशाची इतकी उत्तुंग शिखरं पादाक्रांत केली, इतक्या गोष्टी निर्माण केल्या, इतकी मजल मारली, त्याच परम ईश्वराचं अस्तित्व आज माणूस निव्वळ बुद्धी आहे म्हणून नाकारू पाहतो. 

सर्व गोष्टी स्वयंचलित निर्माण केलेल्या ईश्वराने जन्म पुनर्निर्मिती, मृत्य, पुन्हा जी आत्मरुप ऊर्जा हे अविनाशी तत्व तयार केलं, तीच ऊर्जा पुन्हा नवीन यंत्रात घालून मागील पानावरुन त्या ऊर्जेचा प्रवास पुढे सुरू करून दिला. आत्मतत्वाच्या रुपात कर्मबंधनात गुंफून त्याची साखळी वा शृंखला नेमून दिली. त्या शृंखलेत त्या देहरुप यंत्राला अडकवून पुन्हा नित्यनवीन यंत्रांच्या मालिका तयार केल्या. 

आत्मतत्त्व हे फक्त उर्जारुप असले तरी देहाच्या व्यापात पुनर्जन्माच्या भराऱ्या मारत मूळ उद्देश व मूळ स्थान यापासून भरकटत जाते. देहरुप यंत्र, आपल्याच धुंदीत, कैफात, नशेत, जोशात, गर्वात आणि अहंकारात अनेकानेक चुका करून, वर का हे भोग माझ्या वाट्याला, इथपर्यंत आपण विचारू लागले आहे. कारण करणार देहरुप यंत्र, करवून घेणार मनरुप अज्ञाप्रणाली, ऊर्जा वापरणार आत्मतत्वाची आणि बद्ध होणार आत्मा. म्हणजे या चार भिन्न गोष्टी एकाच देहरुप यंत्राचा भाग आहे तर. 

म्हणजे इथे आपण खूप गहन व मोठ्या प्रश्नाकडे आलो आहोत की मग मी नक्की कोण आहे.  याच प्रश्नापाशी येणं म्हणजे बराच कार्यभाग साधणं आहे. बघूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...