जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
दीनाना कृपेची सावली
अद्भुत सुंदर येई परिमळ
दिव्य तेज तव भासे नयनी
प्रकाशित भू तव कृपेने
मायापती तूच जगतसावली
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
उभे ठाकले मूर्त त्रिदेव
चर्येवरती भाव अलौकिक
नेत्र समावती सारे चराचर
चरणरज देई श्रीपती
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
माऊली मजला घे संभाळून
पापभार घे उदरी तोलून
पूर्ण कृपेची आशा मनी या
बोध वेद मन ना जाणत
माझी तूच गुरूमाऊली
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
चार वेद तव चरणी लीन
सुरवर मुनिजन सारे सेवक
पापक्षालन ब्रीद तव पद
कळते तरी ना वळते साधक
राहो मनी या सेवावृत्ती
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
तूच माऊली अवघ्या जगती
धाडीलेस एकाकी जगती
किती चुकलो जन्मोजन्मी
व्हावी कृपा होवो उन्नती
जन्ममरण चुको जगतपती
जय जय श्रीदत्तगुरुमाऊली
©® कवी : प्रसन्न आठवले
१८/१२/२०२०
०७:५९
Comments
Post a Comment