Skip to main content

माळ चौथी २०१७

अश्वीन शुद्ध चतुर्थी
नवरात्री चतुर्थ  दिवस
माळ चौथी अर्पण

मस्तकी तुझा हात राहुदे
आजन्म तुझी साथ राहुदे
योगेश्वरी माते माझे जोगाईचे अंबे

तुझ्या कृपेची पूर्ण सावली
भक्ता झेली तूच संकटी
मायामोचन माते माझे जोगाईचे अंबे

त्रिभूवन ख्याते कुमारी रूपे
चित्पावना तू वाट दावीते
कुलदैवत तू अमुचे माझे जोगाईचे अंबे

सकला आशीर्वाच तू देसी
मोक्ष मार्गा आम्हा दावीसी
अनेक रुपे तुझी माते जोगाईचे अंबे

जगा तारण्या जन्म घेतला
भवसागर आई सुकर केला
शक्ति रूपिणी माते माझे जोगाईचे अंबे

आठवले ते शब्द जोडले
प्रसन्न होऊनी आशीर्वचले
चिंतामणी तू होसी माते जोगाईचे अंबे

कवी : आठवले प्रसन्न चिंतामणी
२४/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...