सतत तुझ्या बरोबर तुझ मन कस असत
तसाच मीही राणी तुझ्या सोबत असतोच
मन माझ नसत रे माझ्याच ताब्यात
कारण सतत तूच तू जवळ असतोस
आता बोलून मला कॉपी नको करुस
राणी माझ्याच गोष्टी मला नको सांगूस
माझ्या मनाच्या साऱ्या अवस्थाच राजा
सांगते मी तुला तूच कॉपी नको करुस
वाह वा हिच बात आहे तुझी नी माझी
तर माझ मन का तुझ्या ताब्यात ठेवतेस
मी तर अजुन काहीच वेगळ सांगत नाही
तूच दिलय तुझ मन , तुझ्याजवळ ठेवतेस
आता मी काय बोलू तुला, माझे राणी
होते घालमेल पापण्या जेंव्हा मिटून घेतेस
उडाली ग झोप पापण्या मिटत नाहीत माझ्या
रात्र रात्र त्रास देऊन स्वप्नात येऊन जातेस
ऐक तू थोड़ा त्रास घे, सांगतो ते कर जरा
एकदाच सांग स्वप्नातून घरी कधी येतेस
सांग ना सांग राणी घरी कधी ययेतेस
एकदाच सांग स्वप्नातून घरी कधी येतेस
कवी : प्रसन्न आठवले
१२/०९/२०१७
०८:२३
Comments
Post a Comment