अश्वीन शुद्ध अष्टमी
नवरात्री आठवा दिवस
माळ आठवी अर्पण
असुरमर्दिनी , सिद्ध योगिनी
शस्त्रास्राची जननी
शक्ति भक्ति चा संगम आई
सहस्त्र रश्मी वदनी
अष्टभुजा तू अष्ट दिशांचे
तेज तुझेच कृपेने
माया दावी अन संहारी
मुक्ति तव दर्शने
पूर्ण बोध तू महा योग तू
चौसष्ठ योगिनी
असुर शक्तिही भयकापती
नेत्र तेज पाहूनी
तू शक्ति तुज वीण शिवहि
अपूर्ण अर्धांगिनी
अधम शक्तीचे दमन करिसी
तूच भयनाशिनी
उमानाथही लक्ष्मीकांत ही
स्वये तुला मानीति
तुझ्या कृपेचा अगाध महिमा
जन सारे जाणिती
तुझा राहुदे हात मस्तकी
पुत्रा आशीष देसी
आठवले ते शब्द मांडले
प्रसन्न भक्ता होसी
कवी : प्रसन्न आठवले
२८/०९/२०१७
Comments
Post a Comment