Skip to main content

माळ तीसरी २०१७

अश्वीन शुद्ध तृतीया
नवरात्री तृतीय दिवस
माळ तीसरी अर्पण

आई अंबेच्या नावान उधो उधो

तुळजापुरची  आई भवानी जोगवा मागतो
भवतापाचा अग्नि जळू दे जोगवा मागतो
लक्ष  लक्ष हे जन्म फिरुनी भवऱ्यागत फिरतो
आई दिवा दाव तू मोक्षाचा मी जोगवा मागतो

कोल्हापुरची जगदम्बा आई जोगवा मागतो
दीनदुःखी जीव मार्गी लागो जोगवा मागतो
दैन्य हरावे ताप सरावे चरणी मी मागतो
आई मोक्षाचा मार्ग मिळू दे जोगवा मागतो

सप्तश्रृंगी तू वणीं गावची जोगवा मागतो
उभा जन्म हा तुझ्या पायी आई जोगवा मागतो
चुकली कर्मे सुधारण्यास्तव जोगवा मागतो
सन्मार्गा जीव लागूदे मी जोगवा मागतो

माहूर वासी आई रेणुके  जोगवा मागतो
भक्त वत्सले दया मूर्त तू जोगवा मागतो
पापरास मी जमवून बसलो जोगवा मागतो
प्रसन्न वदनी वरदे आई जोगवा मागतो

आई जोगवा मागतो आई जोगवा मागतो
दया करावी नसे पात्र जरी जोगवा मागतो
समृद्धि या राष्ट्रा येवो देवी जोगवा मागतो
अर्पण करतो कर्मफल त्वा जोगवा मागतो

कवी : प्रसन्न आठवले

२३/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...