अश्वीन शुद्ध पंचमी
नवरात्री पाचवा दिवस
माळ पाचवी अर्पण
शक्तिरूपिणी कालरात्रि तू काळ ग असुरांचा
अगाध महिमा तुझ्या शक्तिचा तारसी भक्तांना
तुझ्या कृपेला तोड़ नाही अगाध महिमा साचा
आई शक्ति रूपिणी देवी आई कालिकामाता
दुष्ट शक्तिंचा विनाश करण्या आली या जगती
असुर दमना संकट हरण्या धावून सत्वर येसी
यवन माजले जगी आज जग करते त्राहि त्राहि
तुझ्या कृपेच्या एक कटाक्षा वाट बघ पाहती
कालरात्री तू कालीमाता महाकाली रूपिणी
कालरुद्रा काळ कलीचा मस्तक तुझे चरणी
पूर्ण कृपा ही तुझी राहुदे भक्तांच्या माऊली
आई आई जाप करितो पावसी लावलाही
पावसी लावलाही आम्हा पावसी लावलाही
कवी : प्रसन्न आठवले
२५/०९/२०१७
Comments
Post a Comment