अश्वीन शुद्ध षष्ठी
नवरात्री सहावा दिवस
माळ सहावीअर्पण
प्रथम वंदू गजानन
शारदा द्वितीयेश
वाक्चातुर्य विलास
व्हावा कृपेने ll
जगनमाता कृपा होय
तुझा हात मस्तकी ठेव
म्हणुनी कवनी वाहतोय
पुष्पे सदा ll
तुझा पूर्ण बोध होय
ऎसा नरनारी नहोय
जगी महिमा अगम्य
तुझा आई ll
असुर दुष्ट शक्ति येती
जगा तापा जन्म घेती
तव कृपे निघोनि जाती
मर्दन करिता ll
ऎसा तुझा थोर महिमा
आम्हा बालका जाण ना
तूच वदवूनी ते घेता
आम्हा मुखे ll
माळ सहावी वाहिलि
स्वीकारोनी घेई ती
अक्षम्य काही जरी
तव उदरी घेई ll
प्रसन्न वरदे आई तू
चिंतामणी सदैव तू
आठवले कवनी तू
असावे पाठी सदा ll
कवन : प्रसन्न आठवले
२६/०९/२०१७
Comments
Post a Comment