जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ५ गीत ५
लक्ष्मणांचं मिथिला कौतुक ज्येष्ठ भ्राता श्रीराम एकचित्ते ऐकत असतात. लक्ष्मणांच्या डोळ्यातील आर्श्चय, उत्साह, आनंद आणि संतोष त्याना जाणवत होता ,नव्हे तो साक्षात दिसत होता. आणि हे सर्व ऐकल्यावर त्यांच्यां मुख़ातून अनायासे शब्द निघाले.
सुंदर नगरी राजाची ही नेत्रदीपक तेजाची
भरून राहिली नवलाई नगरी आनंदाची
प्रजाजन इथे दिसती सत्वर झेलाया राजाज्ञा
जशी कामधेनु नांदावी तैसी देवा जनकाज्ञा
भ्राता येथे सदा वीराजे गन्धर्वांचे बहु मेळावे
कल्पतरुंचे मळे येथ अन चिंतामणी खेळावे
उभारिले या नगरिमधे सोन्याची झुम्बरे गृही
इथे वीराजे समाधान अन सुरवर मुनिवर सोहि
येथ लक्ष्मणा कधी न झाली चौर्यकर्मादि पापे
भोगुनी भोग येई मोक्षाप्रद प्राणी स्वयम प्रतापे
इच्छित वर घे नारायण हे सांगे तपी वत्सारे
मला न काही मागायाचे विदेही जन्मा धाड़ी रे
कवी कंठारव, गुणी गुंजारव , मधुर करी आलापे
बहु येथ साऱ्या विद्या अन कलेत भव अर्पावे
धेनु हंबर इथे न येई समाधान गौधन नांदावे
ऐश्या नगरी तुज लक्ष्मणा इच्छि ते मागावे
आता सांगतो तुज लक्ष्मणा इथली रे नवलाई
कर्माने हो साध्य येथ परी इच्छेनेही बाही
इच्छा नच हो तरी मनुजा संकल्पेही साधे
येथे केले जरी पाप तरी कधी न प्राण्या बाधे
इथे गौतमी इथेच गंगा इथे नर्मदा नांदे
सप्तनद्यांचे पुण्य लक्ष्मणा जन्मानेही साधे
नगरी ऐसी असे अलौकिक करे नरेंद्रही हेवा
अश्याच नगरी आज लक्ष्मणा योग भेटीचा यावा
लक्ष्मणाने केलेल्या कौतुकास्पद आणि गौरवास्पद गुणवर्णनाला श्रीरामाची जोड मिळाली. प्रभुनी लक्ष्मणाला जनकराजांच्या नगरीत जायच ठरल तेंव्हाच सांगितल होत की, त्या नगरीत प्रवेश केल्यावर तू अयोध्या सुद्धा विसरशील आणि नगरी पाहून अचंबित होशील. त्यावेळी लक्ष्मणाने मोठ्या आविर्भावात सांगितल होत की अयोध्येपरी सुंदर आणि उज्वल नगरी असुच शकत नाही. आज लक्ष्मणाचे शब्द ऐकून किंचित स्मित केलेल्या प्रभुना लक्ष्मण काय म्हणतो हे बघूया पुढील भागात.
ll जय श्रीराम ll
कवन : प्रसन्न आठवले
०६/०९/२०१७
०६:००
Comments
Post a Comment