आज अष्टमी आज आईचा विशेष कृपेचा दिवस
आजची माळ अष्टमीसाठी
आज अष्टमी ग आई अष्टभुजा नारायणी
अष्टभाव ग सात्वीक भक्ताहाके ये धावुनि
आदिमाया आदि नाही तुझा महिमा अगाध
दैत्य असुर मर्दुनि निजभक्ता निर्भय जाग
तुझा आगळा ग साज तुझे अबोध ग रूप
तुझी लीला अपरंपार दिव्य तुझे ग स्वरुप
तुझे गणित आगळे भौतिकाच्या ही तू पार
चरित्र ते काय सांगू मारीलास महिषासुर
तन मन आत्मा सारे तुझ्या स्वरूपी लागले
तरी तुझी माया अकल्पित ना बुद्धिस आकळे
शब्द आठवले लिहिले आई प्रसन्न मज होई
डोळीयात तुझी मूर्ति ध्यान सदा तुझे येई
हाच वर देई आई तुझे चरण ना सोडी
तुझी कृपा राहोनिया शत जन्म भक्ति जोड़ी
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment