श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीति ११
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
श्रीकृष्ण या नावाबरोबर एक नाव जोड़ल गेलय ते म्हणजे राजकारण. या शब्दाची परिपूर्ण व्याख्या करण तस मुश्किल आहे. राज्य करताना केलेली खलबत , किंवा कौशल्य
आणि युक्त्या वापरून आपले डावपेच यशस्वी करण्याचा यत्न करण किंवा हेतु सफल करण्यासाठी केलेली कृत्य. ही झाली एक मर्यादित व्याख्या.
अर्थात ह्यात फक्त राज्यकरताना करण्यात आलेल्या युक्त्या, प्रयुक्त्या , डावपेच याचाच समावेश होतो. यात तोपर्यंत दृढ़ असलेले बरेच समज श्रीकृष्णानी खोटे ठरवत अनेक नवीन पायन्डे पाड़ले. शत्रुचा पूर्ण अंदाज घेण, त्याची इथंबूत माहिती असण , ती मिळवण , शत्रुच्या ताकदिनुसार डाव आखणी करण, त्यामाहितीचा युद्धात आणि तहात उपयोग करून घेण, या सर्व गोष्टीत नवनवे युक्त्या वापरून कधीही कोणत्याही शत्रुला वरचढ होऊन दिल नाही.
इथे एक गोष्ट जाणवते की यातील अनेक कौशल्याचा वापर प्रत्यक्ष छत्रपतिनी आणि नन्तर पेशव्यानी करून अनेक लढाया मारलेल्या आहेत.
मुख्य तंत्र जे छत्रपतिनी वापरल त्या गनिमी कावा तंत्राचा सुद्धा वापर प्राचीन काळात भगवांतानी केलेला आहे. पण एक महत्वाची गोष्ट की राजकारण हे फक्त राज्य करण्यासाठी न वापरता इतर क्षेत्रात सुद्धा याचा यशस्वी वापर केला. कालयवनाचा अंत, बलराम ददानी सुभेद्रेच दुर्योधनाशी ठरवलेल लग्न होऊ नये यासाठी योजलेली युक्ति वापरून अर्जुन सुभेद्रच लग्न आणि त्यासाठीचा अर्जुनाचा त्रिदंडी सन्यास.
राजकारणात कट कारस्थान करण किंवा समोरच्याचे डाव उधळुन लावण्याची ताकद आणि त्याही पेक्षा व्रुत्ति असण हे मधुसूदनाने जगाला पटवून दिल. एक खुप मोठा दृष्टिकोण जगाला दिला तो म्हणजे धर्माच्या बाजूने आहात म्हणजे साधे भोळेच असल पाहिजे असा कुठेही नियम नाही. तुम्ही दुसर्याला फसवू नका तितक्या खालच्या पातळीला जायची गरज नाही , पण दुसऱ्या कडून फसवले जाल इतके भोळे सुद्धा राहु नका. राज्य करण म्हणजे संतांची मठी चालवण नाही. शत्रुला आणि त्याच्या चालीना आधी ओळखा, त्याचा अचूक अंदाज घ्या, त्याप्रमाणे आपले डावपेच आखा. हा खुप मोठा धड़ा श्रीकृष्णाने आपल्या जीवन चरित्राने घालून दिला. चांगल्या राजाला प्रजेच्या रक्षणासाठी जे जे शक्य आहे आणि असेल ते केलच पाहिजे. नव्हे ते त्याच आद्य कर्तव्य आहे.
ख़र तर श्रीकृष्णाच्या चरित्राबद्दल आणि विषया संदर्भात खुप काही लिहिण्यासारख आहे, तरीही काही गोष्टी मर्यादेत आटोपण श्रेयस्कर असत. म्हणुन यांविषयाचा तात्पुरता समारोप उद्याच्या भागात. संक्षिप्त विश्लेषण आणि सिंहावलोकन .
आजच्या पुरत इथेच थांबूया . उदया निरोपसाठी भेटू.
आणि पुढचा विषय उद्याच जाहिर करीन. पण सुरवात दसऱ्या नन्तर .
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
२३/०९/२०१७
भाग एकादश समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment