आज षष्ठीची माळ आईच्या कृपेनेच आईला अर्पण शब्द तोकडे आहेत पण भाव श्रेष्ठच आहेत ते गोड मानून घ्यावेत
षष्ठ माळ ती स्मरूनि माते अर्पियतो तुज आता
तिमिर सरुदे या जगताचे हेच मागणे आता
तुझी कृपा हीच सावली भय न वाटे कसलेही
नसे वानवा कृपा तुझी ही शंका ना काहीही
मोर मनाचा उल्हासित हो तया सावराया तू
तुझे नाम या ओठी येता धावून येसी त्वरि तू
अनेक रुपे अनेक नामे अनन्य शक्ति तुझिहि
तुला स्मराया कोटि जन्म हे घालावे या जगती
आई असशी कृपाच करसी विषय वासना हरसी
त्रिदेव भक्त तुझेच आई स्वामिनी तू जगताची
शक्ति ना या शब्दा मध्ये तरी मांडतो काही
प्रसन्न होसी कवन मांडतो आठवले त्या शब्दि
उगीच बढ़ाया मांडे ना मी भक्ता सावरी आई
तुज मायेचा हात असुदे पाठीवर मम आई
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment