आज पहिली माळ आली घटपूजा मी बांधली
अम्बे जोगाई सिद्धिदायीं घरी स्थापित मी केली ll
प्रेमे भक्त कृपेवीण भूके जन्मोजन्मी झाले
उधो उधो ललकारी उभा मण्डप गाजवी ll
उभ्या चौसष्ठ योगिनी नामनाला देव तिन्ही
आई तुझे रूप आज गेले जग आनंदोनि
तुझ्या नावाचा गजर वाजे चौघडा दुन्दुभि
आई तुझ्या दर्शनाला भक्त सारे आज आले
प्रेमे भक्त कृपेवीण भूके जन्मोजन्मी झाले
उधो उधो ललकारी उभा मण्डप गाजवी ll
तूचि शक्ति रुपे आई अगणित माया दावी
तुझे प्रेमळ स्वरुप भक्ता डोलावून नेई
आई माया मोह सारे जाली तारी तू लीलये
प्रेमे भक्त कृपेवीण भूके जन्मोजन्मी झाले
उधो उधो ललकारी उभा मण्डप गाजवी ll
माळ पहिली वाहिलि प्रसन्न तू मनी होई
आठवले ते मांडले चूक पदरात घेई
तुझे नाम हेच मनी नित्य विराजे हे पाहि
प्रेमे भक्त कृपेवीण भूके जन्मोजन्मी झाले
उधो उधो ललकारी उभा मण्डप गाजवी ll
© प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment