आज नवमी आजची माळ विशेष आहे
नऊच ओळी आहेत प्रत्येक ओळ न या अद्याक्षराने सुरु होते
आणि 9 हां पूर्णांक आहे अणि माझी स्वतःची जन्म तारीख 9च आहे हे अजुन एक वैशिष्ट्य त्यामुळे नवमीचि माळ विशेष आनंदाने लिहिली आहे
नवमी ग आज आई नऊ दिसांचे पारणे
नवरात्रीच्या पुजेला नवरसांची तोरणे
नवविधा भक्ति करू नवमीला पूण्यकाळ
नवरंगात सजली रूप तुझे परिमळ
नवनाथ तुझे भक्त नवनीत परिमाण
नवमीच्या नऊ माळा केल्या तुजला अर्पण
नमन ग तुज आई स्वीकारीशी तू प्रणाम
नवलाई नऊ दिस तुझा करुनी आदब
नम्र प्रसन्न हां दास आठवले मांडी शब्द
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment