अश्वीन शुद्ध द्वितीया
नवरात्री द्वितीय दिवस
माळ दूसरी अर्पण
आई भवानी जगदम्बे
भक्तवत्सले कुपाकरी
दूसरी माळ मी वाहातो
स्विकारुनी दया करी
तुझे जगी गुणगान करी
जगतमाउली वरदायी
शिवरायांची स्वामिनी
हिन्दू पत राखिली ती
तुझेच रूप जगताला
दिवा दावते रणांगणी
अधम विनाशासाठी तू
होसी साक्षी रणरागीणी
तुझ्याच हाते रणी ग
किती राक्षसे विनाशी ग
तरी भक्त तारावया
पुन्हा जन्म तू घेसी ग
तुझ्या कृपेचा प्रसाद
तुझिया हाते देसी ग
प्रसन्न होऊनी कविराजा
कवना स्विकृत करसी ग
कवी : प्रसन्न आठवले
२२/०९/२०१७
०८:५५
Comments
Post a Comment