आज अश्वीन शुद्ध तृतीया
आजची तीसरी माळ जगन्मातेला अर्पण
आईच्या अंगणी माळ तीसरी वाहतो
सौख्य सारे ते मिळुदे भक्तवत्सले बाहतो
आई भक्तांची माऊली आज हाकेला धावूदे
माणसाच्या जन्मी आलो सोन आयुष्य होउदे
तूच जगन्माता मोहे मन तुजला वाहिले
नवरात्रि पूजण्याची सेवा आम्हालाही मिळे
रूप तुझे वरदायिनी नाम तुझे रिपू भय
कली माजला विचित्र नीति मत्ता उभी जाय
येई साक्षात जननी माझे मागणे मांडतो
होई प्रसन्न स्वामिनी आठवले ते मांडतो
शब्द सेवा करी तुझी हाच वर देई आई
उभा जन्म मी लिहिन हेच होय सत्य माय
तिसऱ्या या माळे साठी शब्द धरित्री आईचे
सौख्य नांदो सर्व दारी आहे मागणे भक्ताचे
जय जगन्माता आई रूद्रेश्वरी प्रसाद
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment