Skip to main content

श्रीकृष्ण नीति ४

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति ४

 गेल्या भागात आपण एक राजकीय षडयंत्र या दृष्टीने  बघितल. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो की यासाठी वसुदेव आणि देवकी यांचीच निवड का करण्यात आली असावी . यासाठी भारतीय मानसिकता जी आताच्या काळात सुद्धा तशीच आहे त्याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल.

तुम्ही आताच्या काळातले किंवा ६०, ७० वर्षातले  चित्रपट पाहिलेत तर एक गोष्ट ध्यानात येईल . जेंव्हा एखाद्या सत्तेला आव्हान द्यायच असेल तेंव्हा तेंव्हा त्यांच्याच रक्ताचा प्रतिनिधी असेल तर सर्वमान्य नेतृत्व म्हणून स्विकारल जात. ही मानसिकता उत्तरेत आणि बऱ्याच अंशी दक्षिणेत सुद्धा आहे.

दूसरी बाब जी प्रकर्षाने जाणवते ती ही की , ज्याला आव्हान द्यायच असेल त्याची जास्तीत जास्त माणस आपल्या बाजूने वळवून घेण सोप्प जात. हीच मानसिकता आजसुद्धा बऱ्याच प्रमाणात आढळून येते. वंशपरंपरेने येणाऱ्या क़ूवतीवर अजुनही, विश्वास आहे लोकांचा किंवा श्रद्धा आहे. आणि हिच अतिश्रद्धा कधी कधी आत्मघाताला आणि पर्यायाने विनाशाला पण कारणीभूत ठरते . तो एक वेगळा विषय आहे.

आतापर्यंतचा  विचार आपण   दैवी भाग बाजूला ठेवून केला.  तरी सुद्धा काही गोष्टी अश्या आहेत, ज्या,  हा विचार करायला भाग पाडतात की,  श्रीकृष्ण हा कोणी मानव नसून मानवी देहधारी परम शक्तिचाच एक पूर्णांश होता की काय. उदाहरणार्थ,

१. आताच्या काळात सुद्धा पडणारा पाऊस इतका धुंवाधार वाटतो कधी कधी , मग विचार करा,  त्या काळातला पाऊस किती भयानक असणार. आणि इतका भयानक पाऊस असताना , यमुनेला पुर असताना (तो तर असणारच कारण श्रावणातला अष्टमीचा पाऊस तोहि त्यावेळचा ) आणि मथुरेहुन गोकुळात वसुदेव कसा काय गेला असेल,  कृष्णाला सुखरूप कस नेल असेल, यशीदेच्या मुलीला , योगमायेला, त्याच पावली परत कस आणल असेल, आणि कोणालाही न कळता कारागृहात वसुदेव परत कसा आला असेल. सर्वच वास्तविकतेच्या कसोटीवर बसत नाही.

२. मुळात देवकीच्या लग्नात झालेली आकाशवाणी सुद्धा एक वैज्ञानिक प्रकार की काय हेसुद्धा एक वेगळच कुतूहल आहे. किंबहुना बऱ्याच पौराणिक कथांमधे आकाशवाणी झाली आणि कथेला गति मिळते वा वळण मिळत. असो,  पण ज्यापकारे वैज्ञानिक प्रगति होत आहे. आकाशवाणी, ती सुद्धा समस्त जगताला वा एका विशिष्ट परिसराला ऐकू येईल अशी काही सोय होण अशक्य वाटत नाही.

म्हणजेच मग एक मुद्दा परत राहतो तो हा की , या सर्व पौराणिक गोष्टी घडल्या तो काळ पूर्ण वैज्ञानिक प्रगतिशील काळ होता का? आणि आज ज्याला आपण चमत्कार म्हणतो वा  समजतो ,  ते विज्ञानाच्या आधारे शक्य होत का त्यावेळी?  आणि नन्तर काही कारणामुळे ते सर्व ज्ञान नष्ट झाल आणि पुन्हा त्याच स्थितिकडे आपण चाललो आहोत बुद्धिच्या जोरावर .  अश्याच अनेक प्रश्नांची अनुत्तरित प्रश्नाचा मागोवा घ्यायचाय. किंबहुना त्याच उद्देश्याने ही लेखमाला सुरु केली.

याच अनुशंगाने बघुया कृष्ण जन्माच्या कथेत  पुढचा काही भाग . आज थांबूया इथेच.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले

१६/०९/२०१७

भाग चतुर्थ समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...