आज सप्तमीची माळ अम्बेसाठी
जगदंबेचरणी प्रणाम करून सादर
आज सप्तमीची माळ सप्त जन्म पूण्य जोडू
माया मोह महिष सारे आईकृपेने ते तोडू
सप्तपाताळ आईचे सप्तस्वर्ग गीत गाती
सप्तरंगात रंगले सप्तपद आशिष देती
सात सत्य जगी धन्य सात लोकी नित्य नांदे
आईसाठी तिन्हीदेव जागुनिया जग रांधे
सात स्वर आईसाठी माय वीणा घेई हाती
सप्त गन्धर्व गायन सात राग ते आळवी
जिव्हा माझी आईसाठी नाम आईचेच घेई
प्रसन्न तू नित्य राही आठवले शब्द देई
सप्तमीचे हे कवन गोड मानुनिया घेई
राग मानु नये आई तुझा आशीष तू देई
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment