आज अश्वीन शुद्ध द्वितीया
नवरात्रीची दूसरी माळ
आजची माळ आई भवानीसाठी
आई भवानी तुझ्या कृपेचा वर दे भक्तानां
तुझ्या दर्शना तुळजापुरला नेई आम्हाला
अमंगळाची छाया सरते तुझे नाम घेता
मनात शंका फिटती साऱ्या पावन तू पतिता
उधो उधो उधो उधो उधो उधो उधो उधो
कृपा आम्हावर राहो तुझीच सदा सर्वकाळ
दैत्य माजले जगी सर्व अन असुर भांडार
उडवी मस्तक रिपू रणी तू रागिणी सर्वेषां
मनात शंका फिटती साऱ्या पावन तू पतिता
उधो उधो उधो उधो उधो उधो उधो उधो
मदन माजले जगी फार या कामहि मातला
संस्काराची होई माती कली फार झाला
अश्या समयी तू आई आमुची येसी मदतीला
मनात शंका फिटती साऱ्या पावन तू पतिता
उधो उधो उधो उधो उधो उधो उधो उधो
जमीन जुमला पैका अडका हाच देव झाला
आई बापाला पुसे न पोरे शेवट घाताला
जगन्माते तू धावून येई फळ दे कर्माला
मनात शंका फिटती साऱ्या पावन तू पतिता
उधो उधो उधो उधो उधो उधो उधो उधो
उद्या जगी या दिसते मजला कली माजणार
तुझ्या भक्तिवींन सारे दुःशल कोण तारणार
आठवले ते लिहिले आई प्रसन्न हो जगता
मनात शंका फिटती साऱ्या पावन तू पतिता
उधो उधो उधो उधो उधो उधो उधो उधो
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment