आजची माळ ललिता पंचमीची
आईच्या चरणी
आज पंचमी ललिता माळ वाहतो तुज माते
कोटि कोटि जन्म झाले नाम तेंव्हा ओठी आले
वरदायी जगन्माते रुपे नवनीत तुझी
भक्तांसाठी आई तीच धरतीला जन्मा आली
आई चन्द्रकला रूप आई मोहनी स्वरुप
तुझे गुणगान करू शकेना ग मी निःशब्द
आई कोल्हासुर मर्दिनी आई रूप तू भवानी
आई रेणुकामाता तू आई माहुर माय तू
आम्हा लेकरांची चूक पदरात घेई तू ग
तुझे दर्शना येऊन क्षमायाचना करिन
अनन्त पापे सारी माझी जन्मोजन्मिचि फेडिन
होई प्रसन्न भक्ताला शब्द तूचि आठवले
आई जोगवा मागतो धाव संकटी सर्वत्र
तुझे पायी ही ग माळ पंचमीची मी वाहतो
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment