Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८४ (विवाह सोहळा १२)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८४ (विवाहसोहळा १२) (प्रसंग सोळावा सुरू) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
अंतरपाट धरून दोन्हीघरचे मामा उभे आहेत. एका बाजूला कृष्ण स्वतः येऊन उभा आहे. फुलांच्या , मोत्यांच्या मुंडावळ्या आणि रत्नजडित सुवर्णकाम केलेला फेटा घालून 

वदन सावळा गोपाळा
उभा वरण्या रुक्मिणी
सकळ देव नरनारी हर्षे
वाट पाहती श्री रुक्मिणी

भाव अंतर्भाव जाहला
हरी देखी अंतरपाटापार
रुक्मिणी येई हळू हळू
हरी हरखून हर्षापार

रुक्मिणी नजर चरणी
हरिचरण देखे हर्षोनी
पाहे वाट घटिका जाय
 वरे हरी हार घालोनी

रुक्मिणी शांत आणि निश्चल भावाने अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला येऊन उभी राहिली. पुरोहितांनी सावधान म्हणायला सुरुवात केली. चोहीकडून अक्षतांचा वर्षाव सुरू झाला. हरी नजरेने रुक्मिणीरुप बघण्याचा प्रयत्न करत आहेत.जरिकाठी पैठणी घालून नखशिखांत अलंकार परिधान करून सुस्वरूप रुक्मिणी प्रत्यक्ष लक्ष्मीरुप दिसत होती. 

सावधान म्हणत पुरोहितांनी मंगलाष्टक द्रुत लयीत नेली तदेव लग्नम सुरू झालं आणि मंगलाष्टक संपातच अंतरपाट दूर झाला, चोहीकडून फुलांचा अक्षतांचा वर्षाव झाला. देव सुरवर ब्रम्हा गणेश महेश आदी सर्व आनंदी झाले आणि ज्या क्षणांची प्रतीक्षा करत काळदेखील स्थिर झाला होता ती घडी तो क्षण येऊन ठेपला. 

अंतरपाट दूर होताच पुष्पहार घेतलेल्या हरींनी रुक्मिणीस पाहिले , रुक्मिणीने रोमांचित होत हरीला पाहिले आणि लाजून पुनः पुनः पाहिले. या दृष्टदृष्टीत परस्पर भाव एक झाले.  हरीने आपल्या हातातील अक्षता रुक्मिणीच्या शिरावर उधळल्या आणि रुक्मिणी स्वतःला हरवून गेली.  पुरोहितांनी स्मरण करून दिले की हरीच्या माथ्यावर अक्षता उधळा रुक्मिणीदेवी. भानावर येत रुक्मिणीने चहुकडे अक्षता उधळल्या. कारण तिला अतिहर्षाने सर्वत्र हरी आणि सर्व सृष्टी हरीमय दिसू लागली. 

पुनः पुरोहितांनी रुक्मिणीला भानावर आणत हरी कुठे आहेत याची जाणीव करून दिली. त्यासरशी लज्जा भावाने रुक्मिणीने हरीच्या माथ्यावर अक्षता उधळल्या. रुक्मिणीस पुरोहितांनी स्मरण करून दिले, जर कृष्ण आपल्याला वर म्हणून मान्य असेल तर आपल्या हातातील पुष्पहार हरीच्या गळ्यात घालून हरीला वरावे. रुक्मिणीने लाजत पण लगोलग तसं केलं , त्यासरशी हरीने देखील आपल्या हातातील पुष्पहार रुक्मिणीच्या गळ्यात घालताच सर्वत्र वाद्यांचा गजर, सनई चौघडे, ताशे, नगारे, ढोल वाजू लागले. 

सर्वत्र एकच आवाज घुमला

कृष्णाने रुक्मिणीस वरले 
रुक्मिणीचे भाग्य फळा आले
निजरूप हरीमय जाहले
पुण्यफल तीज प्राप्त झाले 

सर्वत्र हर्ष उल्हास आणि नृत्य गायन सुरू झाले. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२६/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...