Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६९

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

राजा भीमकाने शुद्धमतीला पाचारण करून आपल्या मनातील भाव कथन केला.

"दोन विरुद्ध व्यक्तित्वे स्ववृत्तीने कर्मपदास पोचली. मन व्यथित आहे एकाने दुराभिमानाने आणि अपप्रवृत्तीने कृष्ण दूर सारला. तर रुक्मिणीने धर्मवृत्ती बाळगून अंतरात्म्याचा आवाज ऐकून परमपावन श्रीकृष्णाचं अर्धांगत्व प्राप्त करून घेतलं. प्रत्येक जीवाला असाच दोन मार्गांचा पर्याय भगवंत देतात. त्यातून कोणता मार्ग स्वीकारायचा व अंगीकारायचा हे तो तो जीव आपली मती, स्थिती आणि संचिती यानुसार करतो. इतकंच आपल्याला म्हणता येईल." 

शुद्धमती यावर म्हणाली

" सरतेशेवटी एकच म्हणता येईल की प्रत्येक जीव हा आपले प्रारब्ध घेऊनच येतो." 

काही क्षण दोघेही शांत झाले. शुद्धमती राजा भीमकाला म्हणाली

" बाकी काहीही आणि कसही झालं असुदे, परंतु लग्नकर्तव्य म्हणून कन्यादान आपण करायला हवं. त्यासाठी श्रीकृष्ण जिथे कुठे असतील तिथे जाऊन हे कार्य संपन्न करणं आपलं कर्तव्य आहे." 

राजा भीमकाने यास त्वरित होकार भरला आणि सेनापतींना आज्ञा केली की , काही निवडक सैन्य घेऊन आम्ही श्रीकृष्णांना भेटावयास व कन्यादान विधी पूर्ण करावयास जातो. याप्रमाणे भीमक व शुद्धमती ,  काही सैन्य यांसह , प्रभास क्षेत्री जाण्यास निघाले. अत्यंत वायुगतीने त्यांनी प्रभास क्षेत्र गाठलं. यादवांचा तळ शोधण्यास फार कष्ट पडले नाहीत. 

इतक्यात या गोष्टीची वार्ता प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि श्रीबलराम यांच्या कानावर गेली. तेही आपल्या उतरल्या ठिकाणाहून भेटावयास निघाले. शहरमध्यात दोघांची दृष्टादृष्ट झाली. भीमकाने श्रीकृष्णास पाहिले, मात्र त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्रीकृष्णाने त्वरेने त्यांना उचलून घेतले. आलिंगन देऊन छातीशी कवटाळले. भीमकांच्या नेत्रातून सहस्त्रधारा सुरू झाल्या. श्रीकृष्णाने खूप वेळ भीमकांना तसच हृदयाशी धरून त्यांच्या हृदयीचे भाव निजहृदयी प्राप्त करून घेतले.  भीमकाच्या अश्रूंनी श्रीकृष्णाचे स्कंद आणि त्यावरील उपवस्त्र भिजून गेलं. 

आलिंगनातून मुक्त होत, हात जोडलेल्या अवस्थेतच, राजा भीमक वदले.

" हे जगन्नाथा , श्रीकृष्णा, आपल्या दोन्ही कुळांना उध्दारणारी , दोन पवित्र जलप्रवाह जोडून महासागर करणारी अशी रुक्मिणी माझी कन्या आहे. श्रद्धा , शांती, निवृत्ती आणि भक्ती यांचं प्रतिरूप वा देहातील रूप म्हणजे रुक्मिणी आहे. माझी आपल्या चरणी एक विनवणी आहे. ती आपण शांतचित्ते ऐकावी. 

हे गरूडध्वजा, आपण विरबलवृत्तीने व धैर्याने वाटेत आलेल्या शत्रूंना परास्त करून रुक्मिणीला हरण करून घेऊन आलात. हा पुरुषार्थ योग्यच आहे. तशीच रुक्मिणीची देखील इच्छा व आकांक्षा होती. त्यानुसार तुम्ही केलेत. परंतु आता विधिपूर्वक कन्यादान करण्याचं भाग्य मला लाभूदे. माझी इतकीच इच्छा पूर्ण होऊदे. आता चार दिवस यथार्थ ते सर्व विधिपूर्वक करून आपल्याला कन्यादान करीन आणि मोक्षप्राप्तीला मोकळा होईन. मी सदोदित आपल्या चरणांचा दास आहे, माझी एवढी विनंती स्वीकारा. " 

इतके बोलून राजाने श्रीकृष्णाला हात जोडले. श्रीकृष्णाने त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि वदले.

" हे नृपवर , महापराक्रमी राजा भीमक , माझी स्वतःची देखील तीच इच्छा आहे की माता देवकी , माता यशोदा यांसह सर्व आप्त स्वकीय यांना पाचारण करून त्यांच्या समक्ष विधिवत रुक्मिणीचे पाणिग्रहण पूर्ण सोहळ्यात करावे." 

श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून हर्षाने शहारलेली रुक्मिणी हर्षोल्हासत विचार करते, माझी स्वतःची जी इच्छा आहे की, यदुनाथांना सोहळा करून, स्वहस्ते  हळद लावून, विधिवत बोहल्यावर चढून, वरावे, ती माझी मनीषा तीच श्रीकृष्ण इच्छा आहे हे ऐकून मनी संतोष जाहला.  

श्रीकृष्ण पुढे राजा भीमक यांना म्हणाला.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
११/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...