Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७८(विवाह सोहळा ६)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७८ (विवाहसोहळा ६)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

या भोजनात वळवट अर्थात गव्हल्यांचेच इतके प्रकार होते. काही पोपळे म्हणजे सरळ, काही वर्तुळाकार , काही सुमनांच्या म्हणजेच विविध  फुलांच्या आकाराचे गव्हल्यांचे प्रकार वाढले जात होते. सूक्ष्म धाग्यासम असलेल्या अनेक रंगांच्या शेवयांच्या खिरींचे नानाविध प्रकार त्यात होते. इतक्या सुक्ष्माकार नाजूक शेवया ज्यांची कलाकुसर करून विविध आकार देऊन क्षीरसाखरी घोळलेल्या परंतु वाढतांना एकही तुकडा न पडता वा पाडता वाढता येत होत्या, इतक्या लवचिक होत्या. त्यांची चव इतकी मधुर होती की त्यातील रसास्वाद उत्तम खावार्थीच जाणू शकत होता. 

प्रत्यक्ष श्रीहरी भोजन करणार हे माहीत असल्याकारणाने अत्यंत लाडात तयार करून वळलेले रसाळ पाकातील वा शर्करायुक्त विवेकाच्या तिळवीय म्हणजेच तिळाच्या बियांनी सजवलेले रसदार चवदार लाडू रांजणच्या रांजण संपत होते. त्याच्या मधुररसयुक्त स्वादाने प्रत्यक्ष श्रीहरी समाधिस्थ होऊन, लाडवाच्या प्रत्येक कणाचा आनंद घेत निजानंदी रत अर्थात रममाण झाले होते. त्यामुळे बाकीच्या लोकांची काय कथा सांगावी. 

वैराग्याच्या आगीत तापलेल्या तेलात तळलेले नानाविध प्रकाराचे, आकाराचे, धान्यांचे, रंगांचे पापड इतके नर्म मुलायमस्पर्शी, पण स्वादिष्ट, होते की ते खाणारा पापडा बरोबर आपलीच बोटे देखील चाखत होता आणि ते बनवणाऱ्या कसबी हातांना मनातल्या मनात धन्यवाद देत होता. कृष्ण स्वतः जावई म्हणून मिळाल्याकारणे हरखून गेलेली राणी शुद्धमती जातीने सर्व वाढप व्यवस्था पाहात होती. कोणी पदार्थांची प्रतीक्षा करत नाही ना, कोणी मागितलं ते प्राप्त होतंय ना, कोणी उपाशी वा अर्धपोटी उठत नाही ना याची सर्वांची व्यक्तिगत विचारपूस राणी करत होती. कारण एकच कृष्णाकडील कोणी अतृप्त राहायला नको. 

उत्तम साखरेची सजावट केलेल्या अनेक रंगांच्या , आकारा तील व सजावटीच्या विविधाकृती गुळवरी (अर्थात ज्याला आंग्ल भाषेत केक अथवा पफ म्हणतात तो. म्हणजेच नाथांनी उल्लेख केलेल्या श्रीरुक्मिणीस्वयंवरात हा उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ केक वा पफ असा आहे. म्हणजे किती अभिमानास्पद बाब आहे ही, की, केक वा पफ हा खाद्यपदार्थ त्याकाळी म्हणजेच महाभारत काळी अस्तित्वात होता.)  सर्वांना आग्रहाने वाढले जात होते.  फुगून तट्ट जाहलेल्या पुऱ्या , त्यासोबत क्षीरधारा वाट्याच्या वाट्या रिचवल्या जात होत्या. 

शुद्ध सफेद रंगांच्या  फेण्या त्याबाजूला अमृतफळ अर्थात आत पुरण भरून केलेला पण मोदकाच्या आकाराचा अतिमधुर पदार्थ ढिगावरी वाढला जात होता आणि ढिगावरी संपत होता. त्यातच मधुर रसाची आणि स्वादाची खांडवी वाट्या भरून वाढली जात होती. यानंतर सर्व प्रकारची फळ घालून केलेली शिखरण वाडगेच्या वाडगे वाढून वाढपी पुढे पुढे जात होते.( मला वाटतं की ही सर्व फळ घालून केलेली शिखरण म्हणजेच आता ज्याला आपण आंग्लभाषेत फ्रुट सलाड म्हणतो तेच असावं. म्हणजेच आपलेच सर्व पूर्वी होत असलेले अन्नपदार्थ नाव बदलून पाश्चात्यांनी आपल्यालाच शिकवले). 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२०/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...