Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६२

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
या सर्व विदारक दृश्यातून पुढे आला जरासंधाचा रथ. जरासंधाची अवस्था पाहून शिशुपाल अधिकच भयग्रस्त झाला. त्याच्याकडे पाहात जरासंधाने त्यास म्हटले.

" हे शिशुपाल , हे जीवन एक सुखदुःखाचे चक्र आहे. यात सतत सुख वा सतत दुःख असत नाही. त्या सर्वसाक्षी ईश्वराने आपल्याला चौऱ्यांशी लक्ष बाहुल्यांच्या आधारे या ब्रह्मांडात फिरवून मोक्षाचा मार्ग अधिक खडतर केलाय. त्यातच सर्व ईश्वराधीन आहे. तुला काय मिळणार हे फक्त तोच जाणे.  त्यामुळे तो ईश्वर फक्त तटस्थ राहून जे ठरवतो तेच होते. 

सर्व काही त्याच्या हाती असल्यामुळे आपण पराधीन आहोत. त्यामुळे काही गेल्याचे वा गमावल्याचे दुःख मानू नकोस. कसलाही खेद बाळगू नकोस. भीमकी मिळणे न मिळणे हे ईश्वरी इच्छेआधिन आहे. त्याच्या इच्छेनेच ती कृष्णास मिळाली. आज काळ त्याच्या पाठीशी आहे. हा काळ ज्याच्या पाठीशी उभा राहील, युद्धात तोच त्या त्या दिवसाचा राजा असतो. आज काळ कृष्ण बलभद्र यांच्या पाठीशी आहे म्हणून ते जेते आहेत आणि माझ्यासह अनेक राजे तृणवत जिंकले त्याने,  कारण काळाने आज त्यांना साहाय्य केले.

 तू देखील तसेच समज की, भीमकी अर्थात रुक्मिणी तुझ्यासाठी नव्हतीच. ती ज्याच्यासाठी होती त्याला ती काळाने देऊन टाकली. याच विचाराने तू तुझे दुःख विसरू शकशील. येथे यश आणि अपयश आपल्या हातात नाहीच. ते सर्वस्वी ईश्वराधीन आहे. माझंच बघ तेवीस अक्षौहिणी सैन्य असून सतरा वेळा, कृष्ण यादवांविरुद्ध केलेल्या युद्धात केवळ एकच जय प्राप्त झाला. त्यामुळे आपण काही खेद न बाळगता , दुःख न करता राहावे.  सुख आणि दुःख ही चक्रे आहेत ज्या योगे हे जीवन चालत असते, हे समजून रहावे. 

म्हणून ज्यावेळी तुला काळ अनुकूल होईल त्यावेळी तू युद्धाचा विचार कर. जेणेकरून तुला युद्धात जय प्राप्त होईल." 

या जरासंधाच्या वचनांनी शिशिपालाचा युद्धज्वर शांत झाला आणि त्याने आपल्या नगराकडे चेदिराज्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. या बोलांनी शिशुपाल शांत झाला आणि त्याने युद्धाचा निर्णय बदलला या कारणे दमघोष अर्थात शिशुपालाचे पिता आणि वसुदेवाची भगिनी श्रुतश्रवा हिचे पती यांनी जरासंधाचे आभार मानून म्हटले.

" आज आपल्यामुळे माझ्या चिरंजीवाचे अर्थात शिशुपालाचे प्राण वाचले. अन्यथा आज कृष्णाने माझ्या शिशुपालाचे प्राण हरण केले असते. आपल्या या उपकाराचा मी सदैव ऋणी राहीन." 

इतके बोलून दमघोष आपल्या नगरास जावयास निघाला. जे राजे जीवित परत आले होते ते आपल्या जिवीत असण्या बद्दल ईश्वराचे आभार मानून जखमींना नेण्याची सोय करत परतते झाले. सर्व वऱ्हाडी म्हणून आलेले आणि नन्तर युद्धात ओढले गेलेले, आपापल्या नगराकडे जाण्यास निघाले. किती अगणित संपत्तीचा नाश झाला, किती संपत्ती जी युद्धभूमीवर सांडली ती यादवांना प्राप्त झाली याची गणतीच होऊ शकत नव्हती. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०३/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...