Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६१

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

हे सर्व रणकंदन चालू असताना तिकडे लग्नमंडपात शिशुपाल   जो नवरदेव म्हणून सजला होता, त्याच्याकडे हा अशुभ समाचार पोचला की, रुक्मिणीला कृष्णाने हरण करून नेले आहे.  हे ऐकले मात्र त्याने तिथल्या तिथे हंबरडा फोडला. धाय मोकलून ढसाढसा रडायला लागला.  अति रडण्याने त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. तद्नंतर दुःखा तिरेकाने तो मूर्च्छित होऊ लागला. लगेच अनेकजण त्या दिशेने धावले.

त्यात वरमाय म्हणजेच शिशुपालाची आईदेखील आवाजाच्या आणि आरडा ओरडा येत होता त्या दिशेने धावली. आधीच घडलेला प्रकार तिच्या कानावर गेल्यापासून तिची अवस्था अस्वस्थ करणारी होतीच, त्यातच मुलाची ही विकत अवस्था पाहून ती अधिकच भाबवून गेली. तिच्या मनात अखंड विचार चालू होता की, का या रुक्मिच्या नादी लागून या कार्याला तयार झालो आणि स्वहस्ते हे संकट ओढवून घेतले. या रुक्मिने मुहूर्त न पाहताच मृत्यूपंचकात लग्न सोहळा ठरवला की काय, कळत नाही. पण सगळी वाताहत झाली आणि तो श्रीकृष्ण योग साधून नोवरी घेऊन गेला. 

इकडे आल्याआल्या तिने शिशुपालाच्या मुखावर जल प्रक्षालन करून त्याला जरा हुशारी येईल हा प्रयत्न सुरू केला. काही जणांनी वारा घालण्यास सुरवात केली. या प्रयत्नाने त्याला थोडं बरं वाटलं. शिशुपालाने डोळे उघडले आणि शुद्धीत येताच पुन्हा आक्रोश करत रडायला सुरवात केली. आक्रन्दुन रडणं त्याने पुन्हा सुरू केलं. 

यातून सावरत त्याने विचार केला. काय दुर्बुद्धी झाली आणि ही सोयरीक स्वीकारली.  आधी ते दोन बंधू कृष्ण आणि बलभद्र हे झुंझार आणि महाबली वीर आहेत. त्यात बाकीच्या यादवांबद्दल तर न बोललेलं बरं. पण तरीही आता वेळ आली आहे तर जाणे क्रमप्राप्त आहे. चला रे रथ जोडा, माझा तिरकमठा आणा, सैन्य सोडा आणि लगोलग पाठलागाला चला. असे म्हणून त्याने ससैन्य नगरातून कूच केली.

परंतु नगराच्या वेशीजवळ त्याला परत येणारे घायाळ सैनिक व सेनाधिकारी दिसले. कित्येक घायाळ ,बाणाने जर्जर झालेले विव्हळणारे सैनिक येताना दिसले. कोणाचा हात तुटलाय वा मोडलाय, कुणाचे दात पडलेत, कुणाच्या कपाळावर भलामोठा घाव आहे आणि त्यातून रक्त वाहून ते शुष्क झालंय, कुणी पायाने लंगडतय , कुणी अनेक घाव लागून आरडत , ओरडत येत आहेत. 

आलेले वा येणारे लोक बडबडत आहेत अरे तो बलभद्र काहीही दया माया दाखवत नाही. रणांगणात त्याला रणमद चढतो आणि तो चहुबाजूंनी हल्ला करतो व समोरचा सैनिक वा वीर यांना विचार करायला उसंत देत नाही. अश्याच अनेक जणांच्या वार्ता ऐकू येत होत्या, त्याही विव्हळणाऱ्या स्वरात. राजाचे नोकरचाकर , दास दासी त्वरेने घायळाना मदत करत, लंगडणाऱ्यांना उचलून वा गाडीवर घालून वा खांद्यावर टाकून उपचारार्थ नेत होते. मोठे विदारक दृश्य होतं आणि करुण किंकाळ्या ऐकू येत होत्या. 

ते करुणाजनक आणि दुःख व क्लेशदायक दृश्य पाहून शिशुपाल धास्तावून गेला. पाठोपाठ अनेक राजांचे रथ , त्याच्या घायाळ अश्वांसह आणि त्यापाठोपाठ घायाळ व विकल जरासंध येताना दिसला. शिशुपाल पुरता भांबावून गेला होता. काय करावे ते त्याला सुचत नव्हते. परंतु यासर्वात रुक्मिणी सारखी सुंदर कन्या आपल्या हातून निसटली याचे त्याला राहून राहून दुःख वाटत होते. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०३/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...