Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७९(विवाह सोहळा ७)(चौदावा भाग समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७९ (विवाहसोहळा ७)(प्रसंग चोदावा समाप्त)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

या सर्व स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद व आस्वाद घेताना वऱ्हाडी इतके मग्न , गुंग आणि दंग झाले की कळीकाळाचाही पाड राहिला नाही. स्वये श्रीकृष्ण इतक्या रुचकर आणि सर्वोत्तम भोजनाच्या तृप्तीचा आनंद घेण्यात हरवून गेले.जिथे ईश्वराची ही स्थिती तिथे सामान्यांची काय कथा. 

या सर्व भोजनोत्तर सर्व भोजनांचा प्राण जिरेसाळ भात आणण्यात आला. वाढणाऱ्यांनी एक शीत देखील खाली न सांडता आणि एक खंड देखील न फोडता प्रत्येकाला खंडी खंडी भात वाढला. यावर पदार्थांची महाराणी अर्थात वरांन्न म्हणजेच ज्याला वरण म्हटलं जातं त्या वरान्नाचे वाडगेच्या वाडगे येऊ लागले. 

या रुखवताच्या भोजनात लेह्य , पेय आणि चोश्य या सर्व प्रकारचे अन्नपदार्थ करण्यात आले होते. जे पदार्थ जिभेने चाटून पोटात  जातात त्याला लेह्य म्हणतात. जे घटा घटा पिऊन पोटात जातं त्याला पेय प्रकार म्हणतात आणि ज्यातील रस चोखून बाकीचा चोथा टाकून दिला जातो त्याला चोश्य प्रकारचं अन्न म्हणतात. अश्या या तिन्ही प्रकारातील आणि नऊ रसातील सर्व भोजनप्रकार यादवांनी रांजणच्या रांजण ,परातीच्या पराती, वाडगेच्या वाडगे रिचवले, अर्थात स्वादामुळेच. 

कृष्णासोबत या पंगतीत , भोजनाची अवीट गोडी , रसास्वाद घेऊन खाणारी मंडळी विशेष व बहु असल्यामुळे रुचकर भोजन बनवून वाढण्याचे बळ आणि स्फूर्ती कौंडिण्यपुर करांना अजून अजून चढत होतं. प्रत्यक्ष कृष्ण, स्वादाचा प्रत्येक ग्रासाचा, आनंद घेत श्रध्दायुक्त भावाने आणि करणाऱ्या हातांना दाद देत खात होता. 

कृष्णाच्या या समाधानीवृत्तीने अन्नग्रहण करण्याचेच अनुकरण अर्थातच समस्त यादवांनी केलं नसतं तरच नवल. शुद्धमतीच्या , आपल्या जावयाला अर्थात जगतपतीला समाधान देण्याच्या इच्छेखातर प्रत्यक्ष चारी मुक्ती , तीन लोक आणि सप्त स्वर्ग स्वतः शुद्धमतीच्या हाताखाली राबत आहेत. जे अर्थात फक्त श्रीकृष्णच पाहू शकत होता. त्यांना क्षीरसागरात समाधिस्थ असलेल्या भगवंतांच सदेह अवनीवर दर्शन , ते सुद्धा  इतक्या जवळून म्हणजे युगायुगात एकदा घडणारा योग , असा योग मुक्ती, लोक आणि स्वर्ग सोडूच शकत नव्हते. अर्थात त्यांना तसं राबताना पाहून श्रीरंग खुलून गेले होते. त्याच आत्मिक समाधानाचं तेज त्यांच्या चर्येवर दिसत होते. कारण त्यांच्या उपस्थितीमुळे भोजन करणारा कोणीही असमाधानी राहणार नाही याची श्रीकृष्णाला देखील खात्री होती. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथ महाराज यांच्या कृपेने चतुर्दश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग पंचदश. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२१/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...