Skip to main content

ll रामगीता फलश्रुती सह ll




ll  रामगीता फलश्रुती सह ll 


ll गंगणपतये ll

अयोध्या जवळ येत आहे हे पाहुन हर्षभरित झालेले सर्व
 भगवान मुख़ातून अजुन काही ऐकण्यास उत्सुक झाले
 हेच जाणुन प्रभु स्वयं  वदते झाले

भगवान श्रीराम उवाच

प्राक्तनात जे लिहिले तुझिया
भोग भोगणे आहे रे तुज
सहस्त्र जन्मे येऊन योनि
कर्मफले बघ मिळती रे तुज

किती अडकसी कर्मगते तू
किती भोगिसी जन्मोजन्मी
तुझे तुला ना उमगत कोड़े
का रति रमसी या कर्माग्नि

कळे काळाची गति तुजला
कळे तुजला किती भोग हे
तुझे भोगणे संपे कधीही
जोवर माया मोहून  राहे

लक्ष्मण उवाच

प्रभु वदावे यातून मार्गा
कैसे जड़जीव सुटती सांगा
कोण्या कर्मे भोग सुटावे
त्या मार्गाचे गुह्यही सांगा



भगवान उवाच
 
योग याग  अष्टादिक मार्ग
परंतु हर युगी नसेल सवडी
म्हणून एकच मार्गा वदतो
नामस्मर तू क्षणही दवडी

मिळेल जो जो वेळ जीवाला
नामा जोडूनी करे सार्थकि
ज्या योगे हे भोग सुटावे
अंति मोक्षाची हो प्राप्ति

भोग भोगताना स्मरणे रे
सुखात ही स्मरशी नामाला
वेळ मिळे तुज पुण्य जोड़ी तू
क्षण ही वाया स्मर नामाला

लक्ष्मण उवाच

नामाची इतुकी महती तर
कोणी कैसे केले आधी
स्पष्ट करुनी सांगावे भगवन
याला आहे क़ाय उपाधी

भगवान उवाच

असे नाम ज्या नाही उपाधी
मिथ्या नाही यांची महती
याच्या योगे तरले ईश्वर
अनेक दैत्या निर्दल करती


महेश , माधव, ब्रम्हाहि म्हण
कोणी यावीण असे वेगळे
तिन्ही लोकी श्रेष्ठ जहाले
नामाने बघ  तरले  सगळे

नको शंकि या अवीट नामा
यावीण जगी ना तरणे कोणी
जन्मजन्मिचा खेळ थांबवी
नामा अधिकची नसेल ऊणी

लक्ष्मण उवाच
एकच पुसतो तुम्हा प्रभु मी
ज्याने केले नामा जवळी
पापे त्याची असतील कितीही
पुसुनी जातील का हो सगळी

भगवान उवाच

असेल जरी कितीही अधमी तो
कोणी पापी नर ही असे मग
नामे स्मरता आत्म्यापासून
वाल्मीकि होई वाल्या ही मग
 
इतुके गुह्य असे नामाचे
परंतु जाणे जो जीव येथे
पापे हरुनी भोगही संपुनी
आत्मा जाई परमात्मा जेथे


फलश्रुति

नसेल आधी कुणीही कथीली
रामगीता म्हणुया हो याला
पारायण  करता घडते हो
रामकृपा ती अखंड त्याला

श्रीरामे इतुकी कॄपा करावी
वाचें यासी तयासी फळणे
पापांच्या राशी उतरोनि
प्रारब्धाचे भोगहि टळणे

रामाचा आशीष तयाला
जो जीव पठतो या गीतेला
अखंड सेवा प्रभुची तयाला
मोक्ष मिळे अंति आत्म्याला

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© शब्द प्रभुंचे
लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...