Skip to main content

जानकी पुनःवनवास ३१

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३१
.
इकडे भरत आपल्या मातेच्या महालाकडे निघालेला असताना  देवी जानकी दोन्ही माताना आराम करायला सांगून आपण स्वतः आपल्या महालात परत आली. तिला उत्सुकता लागली होती कि , स्वामींच आणि भ्राता भरताच क़ाय बोलण झाल असेल. क़ाय बोलण चालू असेल. भ्राता भरत म्हणजे स्वामींसाठी सर्वकाही . भ्राता लक्ष्मण म्हणजे यांची प्रत्यक्ष सावलीच . पण भ्राता भरत म्हणजे प्रतिरूप . आणि दोघे तितकेच प्रिय एकमेकांना आणि तितकेच प्रिय माता कैकईना.

आणि प्रत्यक्ष स्वामी म्हणजे मूर्तिमंत शांतता, धैर्य , बुद्धि, तप आणि तरीही क्षात्रतेज, डोळ्यात समोरच्याला मोहून टाकण्याची शक्ति, पण श्रद्धा आणि भक्ति असलेल्या माणसाला आपले सर्वस्व देण्याची तयारी, प्रसंगी धीर आणि उदात्तता यांची कारुण्यमयी मूर्त असलेले, पण प्रसंगी काळालाही थरकापायला लावण्याच सामर्थ्य असलेले. आणि हे सामर्थ्य गुरुंकडून मिळवून पुन्हा त्याच गुरुचरणी लीन असलेले. प्रत्यक्षी पाहणाऱ्याला दृष्टि सुद्धा हलवू  नये अस वाटत. शांत डोळ्यातील भाव गगनाला गवसणी घालणाऱ्या विजेलाही नतमस्तक व्ह्यायला लावतात.  गंभीर प्रकृति स्थिर आणि कुशाग्र बुद्धि, संयतपणा आणि तरीही करारी नेत्र.

अष्टसात्विक भाव,  निर्मलता यांचा उत्तम संगम, प्रत्यक्ष्
कैलासेश्वर देखील त्रिवार वंदन करण्यास उत्सुक. सावळा वर्ण  असूनही   नीलवर्णासम भासणारी प्रभा, समस्त ब्रम्हांडाची छाया असूनही त्यापार असणारे, सर्वात असूनही सर्वांहुन भिन्न. विचार आणि विकार यांच्या पलीकडे असलेले सर्वसाक्षित्व.  सत्व, रज आणि तम या त्रिगुणातीत भाव. जेंव्हा जेंव्हा मी प्रभुंबद्दल विचार करते तेंव्हा तेंव्हा फक्त हेच विचार येतात.  सर्व चराचराला व्यापुन उरलेले. क़ाय सांगू किती सांगू.प्रत्यक्ष परम पावन. हेच विचार देवीन्च्या मनात असताना अनायासे देवी जानकीच्या मुखातून शब्द बाहेर आले

साजिरे ते रूप राम नामे सर्व सुख
नीलतनय मूर्ति मजसी भासे मोहक
साजिरे ते रूप......

नेत्र लावण्य , भालही विशाल
गगनीचे तेज तैसेची वदन
सुमुख, सुरेख नासिकाग्र
भासे रूप हे श्याम सुघन

वर्णवेना प्रभा प्रवाह
साक्षी असती सहस्त्रसूर्य
चारवेद शास्त्र ऐसे ज्ञान
तरी मूर्तिमंत आहे औदार्य

अजानुबाहु मूर्त मोहवी
सोळा चंद्र शीरी ते सोहवी
राजाराम ऐसा होऊनी प्रकटे
तेज मुखावरी शोभा वाही

भवभाव नेई  तारुनिया
भवसागरी हे नेई पार
ऐसे देखिले मी स्वरूप
आहे चराचराचिया पार

आणि त्याच निजानंदात देवी जानकी समाधिस्त आहे.नेत्रातून अखंड धारा चालू आहेत, आणि लोचनांच्याही पार, आणि आत्म्याच्या जवळ माझे राम, फक्त राम आणि मी. अशी भावावस्था झालेली आहे जानकीची. ज्याचा विचार तिन्ही देव, सर्व ब्रम्हांड आणि ब्रम्हांडातील समस्त सजीव करतात ते रघुवीर माझे परमस्थान आहेत.याहूंन , त्यांच्यां चरणांहुन शुद्ध आणि मनभावन अशी कोणती गोष्ट या जगात असू शकेल अस वाटत नाही, नाहीच , असुच शकत  नाही .

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...