Skip to main content

जानकी पुनःवनवास ३६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३६

"हो सीते अगदी लहानपणापासून  मी सकाळी सर्वप्रथम माता कैकईच्या महाली जाण्याबाबत आग्रही असे. नव्हे तसा हट्टच मी करत असे."

"हो माता कौसल्या म्हणाल्या मला तस "

"क़ाय "

" की आजही तुम्ही नेहमीप्रणाने माता कैकईना प्रथम भेटण्यास गेलात"

एकीकडे या दोघांच हितगुज असच चालू असतानाच राजप्रासादात दुसरीकडे हनुमंत भ्राता भरत यांची भेट घेण्याचा आग्रह करतात. कारण प्रभुंची तशीच आज्ञा आहे त्याना की पुढील सर्व गोष्टी तुला भ्राता भरत यांच्याच मार्गदर्शनाखाली करायच्या आहेत.  शेवटी प्रभुआज्ञा ती ,मग अंमलबजावणी झालीच पाहिजे.  या हनुमंताची एक गोष्ट छान होती, प्रभुआज्ञा म्हटल्यावर त्यात अडचण वग़ैरेचा प्रश्न उद्भवत नसे. कारण शक्ति वा युक्ति या दोन्ही मार्गानी काम करणे म्हणजेच आज्ञा पालन करणे हे एकच या दासास ठाऊक होते.

प्रतिहारिनी कैकईच्या महालात असलेल्या भ्राता भरताला हनुमंताचा निरोप पोहोचता केला. भरताने लगेच बाहेरील कक्षात हनुमंताला थांबण्यास सांगितले. प्रतिहारीस शत्रुघ्न लक्ष्मण आणि श्रीराम आदिना पाचारण करण्यास सांगितले आणि मातेस पृच्छा केली

" माते आता ज्येष्ठ भ्राता रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या दृष्टीने पुढील हालचाली करणे क्रमप्राप्त आहे. तस्मात आज्ञा असावी."

मातेने मोठ्या ममत्वाने त्यास दुजोरा दिला. मातेच्या आशीर्वादाने सर्व कार्य कुशल ,मंगल होईल या सार्थ विश्वासाने भरत बाहेरील कक्षात हनुमंताला भेटण्यास आला. भ्राता भरत आलेले पाहून हनुमंताने त्याच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार केला. ज्यावर भ्राता भरत म्हणाले

" हनुमंता अरे असा नमस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही . तू रामभक्त मीही रामभक्त म्हणजेच आपण बंधुसमान आहोत. त्यांमुळे तू अलिंगनास पात्र आहेस."

अस म्हणून भरत हनुमंताला आलिंगन देण्यासाठी पुढे आले आणि भरताच्या इच्छेचा वा आज्ञेचा मान ठेवण्यासाठी हनुमंताने अलिंगनचा हसतमुखाने स्वीकार केला. पण नन्तर लगेच हात जोडून नम्र विनवणीच्या स्वरात म्हणाले

" मी आहे दास स्वामींचा आणि तुम्ही त्यांचे भ्राता म्हणजे स्वामी समान म्हणून मी आलिंगनास पात्र नाही, तद्वत मला क्षमा असावी"

"हनुमंता मी स्वामींचा भ्राता आहे पण तुझ्या स्वामींची आज्ञा आहे की तू या भरताच ऐकायचस. क़ाय ख़र आहे ना"

" क्षमा असावी पण तुमच्या  कामासम्बन्धी सर्व आज्ञा ऐकायची आज्ञा आहे प्रभुंची आणि ते तर मी निश्चित पार पाडेन. हे वचन आहे, पण तरीही हे तर सत्य आहे की आपणसुद्धा स्वामीच आहात"

"हनुमंता तुझ्या भ्राता रामचंद्रांशी असलेल्या नात्याला जग क़ाय दृष्टीने बघत ह्यात मला पडायच नाही. स्वामी आणि सेवक, भक्त आणि भगवंत , गुरु आणि वत्स , याहूंन पलीकडे असलेल एक नात आहे. कदाचित ते या जगताला अंतापर्यंत कळेल की नाही हे मी जाणत नाही , कारण मी कोणी द्रष्टा नाही. पण हे मी निश्चित सांगू शकतो की ते नात या जगातल्या कोणत्याही व्याख्येत बसूच शकत नाही.

हनुमंता तू कितीही म्हणालास स्वामी आणि दास, तरीही तू प्रभुंच्या हॄदयात आमच्याही आधी आणि श्रेष्ठ जागी आहेस. पण यात मला कोणत्याही प्रकारचा मत्सर नाही. निश्चित अत्यानंद आहे. कदाचित हे नात युगानुयुगाचे आणि अनेकोजन्मांचे आहे, असेल, नव्हे असणारच , जे या जन्मात वेगळ्या रुपात प्रकट झालय. प्रत्येक जन्मात ते वेगळ्या रुपात भासत असल तरीही ते कळीकाळाच्याही पार आहे.

या नात्याला कोणत्याही शब्दात, रुपात, बांधण ख़र तर त्याची महती कमी करण्याचा यत्न असेल. तो प्रमाद याच नव्हे तर कोणत्याही जन्मात हा भरत करू धजावणार नाही. म्हणून तुमच्याकडून पाया पडून घेण ख़र तर ज्येष्ठ भ्राता श्रीराम यानाही रूचणार नाही आणि पचणार देखील नाही."

भरताचे शब्द ऐकत असताना अर्थातच हनुमंताच्या नेत्रातून अखंड धारा बरसत होत्या, निजानंदात हरवलेला आणि प्रभुंशिवाय काहीही माहित नसलेला , मायेच्या पार असलेल्या हनुमंताला जणू आपल्या शब्दानी भरताने खिळवून ठेवल होत. प्रभुप्रेमाच्या बेडित अडकलेला हनुमंत भरताच्या शब्दानी बद्ध झाला आणि मुखे वदला

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...