Skip to main content

जानकी पुनःवनवास १६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १६

पुष्पक विमान जस जसे भुमीच्या दिशेने उतरु लागलं तस तसा असमंतात प्रभु राम आणि देवी जानकी यांच्या नावाचा जयघोष सप्तस्वर्ग ते सप्त पातळ दुमदुमु लागला. ज्या प्रसंगाची पूर्तता करण्यास काळ स्वये भुमी पातला होता ती घटिका पळे आणि क्षण अत्यंत समीप येऊन उभा होता. उभयांसह भ्राता लक्ष्मण यांच्या दर्शनास्तव अवर्णनीय अशी ग्रह स्थिति आकाशात उपस्थित होती. जणू सर्व ग्रह नमस्कारासह विस्मयी अवस्थेत आणि अत्यंत आनंदाने आपापल्या स्थानी कक्षा व लय विसरून स्थिर स्थितीत समर्पित भावाने पुढील आज्ञेच्या प्रतिक्षेत होते.

स्वतः सूर्य आपली सहस्त्र नेत्रकवाड़े उघडून , पण किरणांची प्रखरता , उष्मांकता व दाहकता दशसहस्त्र पटीने कमी करून प्रभुदर्शनार्थ भौगोलिक आणि खगोलीय परिसीमा ओलांडून जणू अयोध्येत स्वये उपस्थित होता, फक्त या अलौकिक दृश्य दर्शनार्थ. इंद्रादि देवांसह अष्टवरूण, गन्धर्व, पंचमहातत्व हात जोडून हा सायुज्य सोहळा आपल्या नेत्रात साठवण्यास सिद्ध जहाले होते. या अनुपमेय , अवर्णनीय आणि नेत्रसुखद सोहळयाच  निवेदन करण्यास स्वये देवी सरस्वतीसह पार्वतीनंदन श्रीगणेश लेखणीसह उपस्थित होते आणि त्यानीच कथिलेले ते महान अंतर्यामी चित्र मी लेखक  माझ्या तुटपुंज्या शब्दभांडाराने उलगडून सांगण्याचा यत्न करतो.

"ते कुबेराच अलौकिक आणि सुरेखित पुष्पक विमान अयोध्येतील प्रासादाजवळील विस्तीर्ण भूभागाच्या दिशेने उतरु लागल आणि समस्त आयोध्यावासीयांच्या अंगावर सहस्त्र रोमांच उभे राहिले. सर्व लोकातुन पुष्पासह नाना अनुपम्य कल्पनारंजक परिमालांची सुव्रुष्टि सुरु झाली. सप्तस्वर्गाची दार यासमयी उघडली गेली आणि कालपुरुष व यमराज यांच्या आज्ञेनूसार त्यासमयी मृत्युप्राप्त झालेले व आधीपासून अतृप्तस्वरूपात असलेले सर्व आत्मे मोक्षास प्राप्त करते झाले. सर्वत्र फक्त आनंद आणि जल्लोष याव्यतिरिक्त कसलाही मागमुसदेखील नव्हता. "

"पुष्पक भूमिवर स्थिर झाल्यानंतर स्वतः राजपुत्र भरत आणि शत्रुघ्न विमानाजवळ गेले. त्यानी स्वतः विमानात प्रवेश करून प्रभु श्रीराम माताजानकी याना शीश चरणकमलांवर लवून प्रणिपात केला. प्रभुनी भरताला आलिंगन दिले आणि जणू श्रावणधारा बरसाव्यात तत्सम अश्रुधारा त्या चारही नेत्रातुन आणि त्यायोगे उपस्थित सर्व नेत्रातून बरसु लागल्या. प्रभुना भरताच्या सांत्वना प्रीत्यर्थ क़ाय शब्द वदावेत हेच सुचत नव्हतं. स्वये देवी शारदा शब्दानच्याही पलिकडील या दृश्यासाठी शब्दभांडार शोधून पाहात होती आणि श्रीगजानन अश्रुधारानमुळे स्थितमुद्रित जहाले होते."

(या अलौकिक दृष्याच्या वर्णनार्थ लेखकाची लेखणी अपुरी आहे, तस्मात काही न्यून असल्यास वा सांगायचे राहिले असल्यास ती लेखकाची चूक समजावी. यापुढील दृश्यवर्णन पुढील भागात)

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...