Skip to main content

जानकी पुनःवनवास २४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २४

इतक्या वर्षानी भेट झाली आणि मधल्या काळात झालेली ताटातूट हे आठवल्यामुळे कदाचित मातेला अश्रु आवरले नसतील अस वाटून प्रभु सुद्धा मातेची  समजूत काढण्यासाठी मातेबरोबर खाली बसले आणि अश्रु भरलेल्या मातेच्या चेहर्यावरुन अश्रु पुसत म्हणाले

"माते आता आम्ही आलोय ना आणि माझच प्रतिरूप असलेला भरत होताच की माझ्या अनुपस्थितित "

हे वाक्य ऐकून , कैकयीला अश्रून्चा आवेग अजूनच अनावर झाला. जे घडलय त्याला आपणच जबाबदार आहोत आणि त्याबद्दल आपला पुत्र भरत याने आपल्याला बोल लावले आणि गेली चौदा वर्ष अबोला धरलाय, हे सांगू कस आणि तेही प्रत्यक्ष रामाला, ज्याचा प्राण भरत आहे, त्या भरताबद्दल कस सांगू  आणि हे ऐकून माझ्याबद्दल रामाचे मन कलुषित होईल का.

कैकयीच मन तुलना करत होती रामाची, भरताशी. एकीकडे स्वतःच रक्त जे तिचा चौदा वर्ष निर्भत्सना , तिरस्कार आणि राग राग करतय. ज्याने तीचा चेहरा देखील पाहिला नाही चौदा वर्ष आणि दूसरा तिचा रक्ताचा पुत्र नसून सुद्धा पुत्रवत माझ पातक विसरून, स्वतःची कोणतीही चूक नसतानादेखील फक्त माझ्या विचित्र वागण्यामुळे आणि मागण्यामुळे ज्याला चौदा वर्ष शिक्षा भोगावी लागली, तो राम, माझाच राम, सर्व सर्व विसरुन, माझीच विचारपूस करायला, कोणाचीही पर्वा न करता आलाय, उभा आहे आणि माझीच काळजी करतोय,मलाच समजावतोय.  आता या स्थितीत त्याला कस सांगु आपल्या अश्रून्च ख़र कारण. कैकयी यांच विचारात आहे

इकडे प्रभुंच्या लक्षात आल नाही की  बोलताना आपल अस क़ाय चुकल ज्यायोगे  मातेचे अश्रु कमी होण्याऐवजी अजूनच वाढलेत. पण क़ाय घडलय हे समजुन घेण गरजेच आहे हे जाणून प्रभु मातेला म्हणाले

" माते माझ्या बोलण्यात अशी क़ाय चूक झाली की आपल सांत्वन करण्याऐवजी आपले अश्रु आणि दुःख वाढवल मी. की एखाद्या दुखत्या जखमेवर मी चुकुन बोट ठेवल. माते जे असेल ते स्पष्ट उलगडून सांगा. की अस काही इथे घडलय का जे मला ज्ञात नाही आणि आपण सांगू इच्छित नाही. तस जऱ असेल तर माते तुला माझी शपथ आहे जे असेल ते मला स्पष्ट आणि सविस्तर सांगा. मी ऐकेन जे असेल ते. की माझ्या हातून काही प्रमाद घडलाय. तस असेल तर टी बाब आणि  त्याच परिमार्जन कस कराव तेही सांग. पण तू आता अश्रु ढाळण कृपया थांबव माते"

अस म्हणून प्रभुनी हात जोडले. प्रभुंच्या हातास धरुन माता कैकयी म्हणाली

"रामा अरे इतकासुद्धा चांगला नको वागूस की माझ्या चुकांची सुद्धा मला लाज वाटावी. इतकी दुष्ट आणि पापिणी सारखी वागले मी" 

इथे मातेच्या बोलण्याला मधेच थांबवत प्रभु म्हणाले

"माते का अस म्हणतेस कोणी काही म्हणाल का. माते कॄपा करून सुस्पष्टपणे सांग आणि निःसंकोचपणे"

कैकयी मागच सर्व आठवून, त्याच घडलेल्या घटनांमधे व त्यासम्बंधीच्या विचारात गढून गेली होती, ज्यावेळी रामाने मातेला नम्रपणे हात जोडून पुन्हा विचारल

" माते कोणतेही दडपण न बाळगता सांग , पुन्हा सांगतो कोणतही भय वा संकोच न ठेवता सांग आणि काहीही असेल ते ऐकायची तयारी आहे माझी"

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवल

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...