Skip to main content

जानकी पुनःवनवास २१

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २१

सर्वच जण या हास्य कल्लोळात बुडालेले असतानाच प्रभुना स्मरण होत की या सर्वांमधे माता कैकयी कुठेच दिसत नाही. प्रभुना मातेची मनस्थिति समजते ज्यायोगे घडलेल्या प्रकाराला सर्वस्वी आपण कारणीभूत आहोत आणि यास्तव आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही या मनस्थितीत मातेने  आज चौदा वर्ष , चौदा वर्षातील प्रत्येक क्षण अन क्षण, रात्र रात्र जागुन, अपराधी मनस्थितित आणि मनावर कल्पनातीत दडपण घेऊन काढले असणार.

जे घडल त्यात दोष कुणाचा आणि दोषाच परिमार्जन कोणी केल वा परिणाम कोणी भोगले कुणी याचा क्षणमात्र प्रभुनी विचार केला नव्हता. किंबहुना अश्या विचारांचा स्पर्शदेखील प्रभुना होऊ शकणार नव्हता. आणि हीच मनोवस्था देवी जानकीची सुद्धा होती. गेल्या चौदा वर्षातील प्रत्येक क्षणी दोघानाही माता कैकयीच्या मानसिक अवस्थेबड्डल चिंता सतावत होती, की या दोषाच खापर फोडून त्याना बोल लावण्यात येतील का, त्याना कशी वागणूक मिळत असेल.

कित्येक वेळा यावर प्रभु आणि देवी यांच्यात चर्चा सुद्धा होत असे. म्हणूनच हे सर्व लक्षात येऊन प्रभु थोडे खजील झाले की आपण ही गोष्ट विसरलोच कशी. प्रभुंच्या चेहर्यावरुन ही गोष्ट देवी जानकीने ताडली आणि देवी वदती झाली

" स्वामी आपण व्यर्थ चिंता करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून विचारपूस करावी, हे योग्य, अस माझ मत आहे."

प्रभु त्यावर होकारार्थी मान हलवतात.

या सर्व काळात एक व्यक्ति खुप आशेने आपल्या स्वामीकडे पाहात होती आणि ही गोष्ट प्रभुनी जाणली होती.म्हणूनच त्यानी पुढील सूचनांची लगबग केली

" लक्ष्मणा तू तुझा वेळ उर्मिलेला देऊन तिची यथायोग्य चौकशी करावीस , दोन्ही माताना घेऊन वैदेही स्वतः आमच्या महालाकडे निघेल, भ्राता भरत आणि शत्रुघ्न स्वतः सर्व सन्मान्य अतिथिना त्यांचे  त्यांचे कक्ष आणि इतर सर्व व्यवस्था दाखवतील."

हनुमंत समोर नम्रपणे हात जोडून उभा राहतो आपल्यावरील कार्यभारासाठी. हेच जाणून प्रभु म्हणतात

"हनुमंता तू या कार्यात भरत आणि शत्रुघ्न याना लागेल ती सर्व मदत करावीस. "

हनुमंत " जशी आज्ञा प्रभु "

इकडे सूचनांबरहुक़ूम सर्व लगेच कामाला लागले. हनुमंत भ्राता भरत याना नमस्कार करून म्हणाले

" भ्राता भरत जे काही काम असेल ते सर्व मला सांगा. प्रभुंची तशी आज्ञा आहे मला. "

भरताने हनुमंताला काही कामाच्या सूचनां केल्या. हनुमंताने कामाची सुरवात केली सुद्धा.  हनुमंताला काम सांगून भरत आलेल्या अतिथीना त्यांची व्यवस्था दाखवण्यासाठी निघून जातो.

या सर्व व्यवस्थापनेच काम चालू असताना  प्रभुराम कैकयीच्या महालाकडे जायला निघतात.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...