Skip to main content

जानकी पुनःवनवास ३५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३५

कैकईच्या महालाबाहेर पडलेले प्रभु शांत आणि निश्चल भासत होते, नव्हे ते शांतच होते. इतक्या स्थित्यंतरातून गेलेले आणि  तरीही तितकेच शांत आणि एकाग्र असलेले प्रभु खरच खुप अनुकरणीय व्यक्तित्व होते. जीवनात इतके चढ़उतार पाहुन आणि मनासिकतेच्या अनेक कसोट्यामधुन जाऊन देखील मनाचा तोल कधीही न ढळू देता , धीरोदात्तपणे  निर्णयक्षम राहून सयोग्य निर्णय घेण हा प्रभुंचा गूण खरच कौतुकास पात्र आणि दुर्लभ होता. एक राजा होण्यास पूर्णपणे सक्षम असण्याचे ते उत्तम लक्षण होते.

प्रभु शान्तचित्ते आपल्याच महालाकडे निघाले. देवी जानकीच्या महालाकडे निरोप गेला. देवी जानकी इकडे प्रभुंची प्रतीक्षा करते आहेत, कारण माता कैकईच्या महालातील व्रुत्तान्त कथन करण्याच वचन प्रभुनी त्याना दिलेल असत.  प्रभुंच्या आगमनाने देवींचा चेहरा प्रफुल्लित झाला. प्रभु मंचकावर नीट स्थानापन्न झाल्यावर देवीनी त्याना महालातील इतिव्रुत्तान्त कथन करण्याचा आग्रह केला

"माता कैकई कश्या आहेत आणि भ्राता भरतानी आपल्या मातेचा स्वीकार केला आणि माता कैकई यांची  त्यावर क़ाय प्रतिक्रिया आहे. सर्व कुशल आहे ना. अर्थात आपण जिथे असाल तिथे सर्व काही सकुशल असणार हे मी जाणूनच आहे. पण तरीही आपल्याकडून सर्व कथन एकण्याची उत्सुकता मनाला लागून राहिलेली आहे. जी आपल्या येण्यापर्यन्त चरणसीमेवर आहे , म्हणूनच अधिक विलंब न करता आपण सर्व सांगाव"

प्रभुनी देवी जानकीच्या मुखकमलाकडे एकवार पाहिल आणि त्या चेहर्यावरिल ओत्सुक्य आणि प्रश्नार्थ भाव पाहुन प्रभुना क्षणिक कौतुक देखील वाटल.  म्हणून थोड़ स्मित करून प्रभु वदते झाले. इकडे देवी जानकी ऐकण्यास आतुर झाल्यात, आणि प्रभु म्हणाले

" जानकी दोघानाही आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असुन त्यानी तो साश्रु नयनानी एकनेकाजवळ मान्य केल्यानंतर गत घटनेचे फार महत्व शिल्लक राहाते का? . आमच्या मते नाही, आणि म्हणूनच तस दोघानाही सांगून आम्ही आलोय की जे झालय ते एक दुष्टस्वप्न समजुन दोघानीही विसरून जाण हेच कुल आणि काळ यांच्यासह सर्वांच्याच हिताच आहे. "

"अर्थात ते दोघानीसुद्धा मान्यच केले असेल"

"होय सीते, त्यानी ते मोठ्या मनाने स्विकारून पुढे मार्गक्रमणा करण्याचे योजिले, हे उत्तमच झाले. "

" होय स्वामी , अर्थातच जे घडून गेले आणि जे अनेक अर्थाने अनेक  जणांच्या आयुष्याशी निगडित आहे वा होते , ते एक दिवास्वप्न समजुन विसरणे हेच हितावह आहे, अस माझहि मत आहे. कारण ....."

"क़ाय सीते जे असेल मनात ते स्पष्ट बोल, अगदी निःसंकोचपणे आणि निश्चयाने. कारण तू तर माझे अर्ध अंग आहेस , तुझे विचार मजप्रत पूर्णपणे पोचण गरजेचे आहे. "

"काही नाही,  इतकंच की गत काळाचे चटके सर्वानीच सोसले आहेत, आणि म्हणून ते विसरुनच पुढे जाणे हितकारक आहे"

" योग्य वदलीस सीते. निश्चितपणे तुझे आणि माझे विचार योग्य दिशेने जाणारे आणि दूरगामी सकारात्मक परिणाम साधणारे आहेत. "

इतक्यात प्रभुना भ्राता लक्ष्मणाची सय आली आणि ते देवीला म्हणाले

" भ्राता लक्ष्मणाला भेटावयाचे राहून गेले"

" आज चौदा वर्षानंतर ते एकमेकांना बघत व भेटत आहेत . आपण नन्तर भेटुया का , मलासुद्धा उर्मिलेला पुरेस भेटावयास मिळालेच नाही तेंव्हा ....."

स्मित करून प्रभु म्हणाले

" बर चालेल , काहीच हरकत नाही. पण माता कौसल्या आणि माता सुमित्रा याना फार वेळ देऊ शकलो नाही. कारण लगेचच मी माता कैकईला भेटावयास गेलो. माता कौसल्या नाराज तर नाही झाल्या ना"

"नाही स्वामी , अर्थातच त्या जाणुन आहेत की, लहांनपणापासून आपली माया माता कैकईवर अधिक आहे ."

प्रभु किंचित हसून म्हणाले

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...