Skip to main content

जानकी पुनःवनवास २३

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २३

इकडे रामाची पावलं माता कैकयीच्या महालात प्रवेश करतात आणि आत निरोप जातो की स्वयं श्रीराम आलेत. तो निरोप ऐकून कैकयी हतबुद्ध अवस्थेत उठते, परत सर्व जीव गेल्यासारखा खाली बसते आणि एका क्षणात अंगातील सर्व बळ पणाला लावून अन्तःपुरातून बाहेरच्या दिशेने धावत निघते, रामाकडे .  कारण , कारण आधी ती परिणामाच्या कल्पनेने धस्तावते पण  तीला एका क्षणात उमगत की आज आलेली संधी चौदा वर्षान्च्या घनघोर प्रायश्चित्तबद्ध तपश्चर्या पार केल्यानन्तर आलेली आहे. आज जे असेल ते असेल, जे होईल ते होईल पण यातून सुटकेचा हा एकच किरण, एक अंधुकसा कवडसा तिला दिसलेला असतो.

ती अत्यंत लगबगिने अन्तःपुरातून बाहेर येते, तिथे तिचा राम घननिळा रामचन्द्र , चौदा वर्षानी तिच्या समोर उभा होता. ज्याच्या दर्शनाने एकेकाळी तिची निद्रा उघडत असे ब्राम्हमुहर्ती, तो समस्त रघुकुलाचा चंद्र , रघुनाथ , रघुकुलदीपक  तिचा लाड़का राम आज चौदा वर्षानी समोर येऊन उभा होता. तीच शांत, धीरगंभीर सावळी मूर्त. तीच आश्वासक नजर, आणि तीच समोरच्याच्या डोळ्यात थेट बघत न घाबरता सुस्पष्ट, मुद्देसुद बोलण.

तिच्यात हिम्मत होत नव्हती क़ाय बोलू, कसा विषय सुरु करू, क़ाय म्हणेल राम, क़ाय प्रतिक्रिया देईल, कसा स्विकारेल माझ्या प्रमादाना, माझ्यासारख्या दुष्ट वर्तनाच्या कुलक्षणी स्त्रीला. होय याच उल्लेखाने मला संबोधल गेलय सर्वांकडून , प्रजाजनांकडून, भरताकडून.  या विचारांच्या कोलाहलात कैकयी अतिनिराशाग्रस्त स्थितीत चौदा वर्षान्च्या प्रायश्चित्तायुक्त मनःस्थितित अचानक हात जोडून रामाच्या पायाला स्पर्श करायला जाते, आणि या विचित्र आणि अनपेक्षित प्रतिक्रियेने चपापलेल्या रामाने एका  क्षणात स्वतःला मागे ओढल आणि क्षणाचाहि विचार न करता मातेला खांद्याला धरून उचलल आणि स्वतः चरणस्पर्श करून मातेला म्हणाला

" माते क़ाय करतेस माते, सहस्त्र जन्म नरकात काढून सुद्धा परतफेड न करता येणाऱ्या पातकाचा धनी करत होतीस मला माते , हे क़ाय आणि का "

माते या अकस्मात सुखावह वाटणाऱ्या शब्दानी जणू अमृतसिंचन केल्याचा भास तिला झाला. जणु अनंत जन्म नरकयातना भोगत असलेल्या आत्म्याला अचानक संजीवनी मिळावी आणि त्याची त्या नरकयातनांमधुन सुटका व्हावी तसाच प्रत्यय कैकयीला आला. या क्षणी तिची स्थिति स्वर्ग पृथ्वी पाताळ तिन्ही लोकीचं राज्य  मिळाल्याप्रमाणेच झाली होती. कारण आज चौदा वर्षानी तिला कोणी तरी माता अशी हाक मारली होती , ती देखिल  इतक्या प्रेमळ स्वरात आणि हर्षभराने ती प्रफुल्लित होऊन रामास म्हणाली

रामा तू , म्हणजे तुझा, खरच तुला ..........

रामाने या तिच्या प्रतिक्रियेने आश्चर्य मुद्रेने विचारल

" माते मी राम, तुझा राम, तुझाच लाड़का राम चौदा वर्षानी परत भेटतोय. म्हणून तूझ्या आनंदाला सीमा राहिलेल्या दिसत  नाही. ख़र ना"

कैकयी, आपल्या कानांवर विश्वास ठेवावा की डोळ्यांवर या संभ्रमात होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आणि सुखद धककयामुळे भ्रमित होण्याप्रत स्थितीत ती आली होती.

" माते आपल्या दीर्घ कालीन ताटातूटीमुळे मिळालेल्या धककयातून  मनाला सावर आता आज मी इथेच राहणार तुझ्याकडून चार घास खाण्याची माझी इच्छा आहे."

हे इतकं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा तिला कधी मिळेल हे दिवास्वप्नात सुद्धा तीने कधी पाहिलं नव्हतं .या अचानक झालेल्या बदलामुळे कैकयी, सुखाच्या ढगांवर स्वार झालेली कैकयी, एकदम चौदा वर्षानपुर्वी भरताने केलेल्या आरोपांची आठवण आल्यामुळे आणि त्यानन्तरच्या एकांतवासी आयुष्य आठवून अचानक जमिनीवर बसते आणि तिच्या डोळ्यातून अनंत अश्रुधारा सुरु होतात. अनायासे.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...