Skip to main content

जानकी पुनःवनवास १४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १४

इकडे प्रजाजन, राजपरिवार, अयोध्येतील समस्त सजीव व निर्जीव लोचनात जणू प्राण आणून क्षण क्षण कासावीस होऊन आणि निर्जली राहून आपल्या प्रिय राजपुत्र प्रभु श्रीराम , देवी जानकी आणि भ्राता लक्ष्मण यांची प्रतीक्षा करत होते. पण या सर्व आनंदावस्थेत  खरे प्राण लोचनात आले होते ते राजकुमारी देवी ऊर्मिला आणि भीतियुक्त भावनेने राणी कैकईच्या लोचनात. त्या दोन्ही स्त्रियांची लोचने अखंड वाहून जणू धरणीवर जलसंचय झाला होता. कोणीही या दोघिंच्या मनोवस्थेप्रत पोचुहि शकत नव्हते. कारण त्यांचे भोग फक्त भोगुनच समजू शकतात , कल्पनेच्याही पलिकडील अवस्था होती ती.

प्रजाजनांचा उत्साह, वाद्यांचा गजर, जणू कर्णपटलाचा वेध घेतात की क़ाय असाच भास होत होता. नृत्य आणि हर्षोल्हासामुळे अवनीवरची मृत्तिका आसमंताला स्पर्श करण्याच्या अवेशात होती. सर्वत्र जणू नववर्ष स्वागताची धूम होती. गुढ़या तोरणे व पताका यानी अयोध्या नटली होती , जणू एखाद्या नवयौवने सारखी.

सर्वत्र संचारलेल्या ह्या धुंदीत , वसंतालाही जाग आली होती. पशु पक्षी या बरोबरच वेली, झाड़े, पाने, फूले, सम्पूर्ण निसर्ग रघुरायाच्या आगमनासाठी आणि सुस्वागतासाठी आतुर झाले होते. म्हणून निसर्गाने आपल्या अनंतहस्ते नवरंगांची  उधळण केली होती. रवीराजा सुद्धा सौम्य किरणांनी या महत्वाच्या क्षणाची शोभा वाढवत होता. समस्त राजपरिवार आणि अयोध्यावासी फूले, हार, गुलाल यासह अनेक रंगाची उधळण करण्यासाठी आतुर झाले होते. सम्पूर्ण अयोध्या रांगोळीसह सजून प्रतिक्षेत होती.

प्रजाजनाना ह्या दिवसाची व क्षणांची प्रतीक्षा चौदा वर्ष होती. या चौदा वर्षातील प्रत्येक क्षणाचा जणु प्रतिशोध प्रत्येक अयोध्यावासी काळाशी घेत होता.  आणि जणू काळालासुद्धा आज हा प्रतिशोध प्रिय वाटत होता. कारण ह्या क्षणाची प्रतीक्षा काळ देखील करत होता . जस जशी श्रीरामांच्या आगमनाची घटी जवळ येत होती तस तशी तिन्ही लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. जणू सर्व देव , देवी , यक्ष, गन्धर्व,इंद्रादि देव , सप्त स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, आदि आतुर जहाले होते या नयनरम्य अद्भुत सोहळयात सामिल होण्यासाठी.

या सर्व धामधुमितच पुष्पक विमानाने अयोध्येच्या आसमंतात प्रवेश केला आणि ते पुष्पसंरचनेने सजलेल, हंसासमान आकार असलेल आणि समस्त विश्वाचे स्वामी आणि स्वामिनी याना आपल्या पाठीवर घेऊन अनेक कोसांचा आणि अनेक प्रदेशांचा प्रवास करून आलेल पुष्पक विमान आकाशमार्गे अवतीर्ण झालेल, प्रत्येक अयोध्यावासी समक्ष चक्षुरवै सत्य पाहात होते. प्रभुनसह समस्त प्रवासी या भारलेल्या दृश्याने अचंबित आणि आनंदित जाहले होते. एक वैश्विक चमत्कार साकारून आला होता. अलौकिक आणि गूढ मोहकपणा सर्वत्र भरून वाहात होता.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...