Skip to main content

जानकी पुनःवनवास २८

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २८

लक्ष्मण आपली पत्नी उर्मिला हिला घेऊन आपल्या महालात येतो. चौदा वर्षानी भेटणारे दोघ, पण दोघेही तितकेच धीर आणि संयमित होते. दोघानाही आपल्या वास्तविक कर्त्वयाच पूर्ण ज्ञान असल्यामुळे, या चौदा वर्षातील विरहाचा, कोणताही  विपरीत परिणाम, त्यांच्या वागण्यात दिसत नव्हता. इतका संयतपणा आणि संयम होता त्यांच्याजवळ आणि कर्तव्याची जाणीव.

किंबहुना कर्तव्यपूर्ततेची पराकाष्ठा म्हणजे लक्ष्मण आणि उर्मिला यांच समर्पित जीवन. ज्यावर फारच थोड़ भाष्य केलय रामायणात. यांचा संवाद कसा आणि क़ाय होणार याची उत्सुकता ही काळालाही लागून होती. तीच उत्सुकता आपल्यासुद्धा असल्यामुळे आपणही याच्यविषयी जाणून घेण्याचा यत्न करूया.  जेणेकरून त्यांच्याविषयी अजून काही नवीन गोष्टी किंवा त्यांच्या जीवनाच्या काही पैलुंविषयी आणि जीवनाच्या तत्वज्ञानाविषयी काही उदात्त जाणून घेता आल तर बर होईल. बघुया तर

उर्मिला आणि लक्ष्मण एकमेकांना बघत आहेत. जणू चौदा वर्षान्च्या विरहाच्या खुणा त्या नजरेत जाणवत आहेत दोघानाही. विचित्र परिस्थितीत त्याना नियतीने अडकवून एक वेगळ व्रतस्थ जीवन जगण्याच्या विवरामधे त्याना सोडून, चौदा वर्ष ती नियति फक्त बघत होती. ही शांतता चौदा वर्षान्च्या विरहाहुन जास्त भयाण भासत होती.  कोणीतरी कोड़ी फोडण गरजेच होत. हे लक्षात येऊन लक्ष्मण उर्मिलेला म्हणाला

" कशी आहेस उर्मिला"

चौदा वर्षानी  पतिकड़ून ऐकलेल्या नावाने मोहरुन मधल्या विरहाला क्षणिक विसरून , पुन्हा स्वतःला भानावर आणत उर्मिला म्हणाली

" जशी मी असावे अशी आपली इच्छा होती आणि असेल तशीच आहे. "

" मला जाणवताय की कर्तव्याची परिसीमा म्हणजेच उर्मिला हे तुझ स्थान नककीच राहिल, माझ्या , आमच्या सर्व प्रजाजनाच्या मनात"

"हा एवढा सर्व खटाटोप फक्त तुमच्या शब्दानखातर केला होता. बाकीं कोणताही हेतु वा जाण मनात ठेवून केल नव्हतं हे. आणि आपण जाणता आपल्या आज्ञेच्या पालनार्थ आपली चौदा वर्षानची निद्रा माझ्या निद्रेसोबत मी उपभोगल्ये. "

" हो मला आठवतय अजूनही वनवासाच्या पहिल्याच रात्री निद्रादेवी मला येऊन सांगू लागली की स्वतःला माझ्या स्वाधीन करा आणि आपली निद्रा पूर्ण करा. त्यावेळी बन्धुप्रेमापोटी आम्हीच तिला म्हणालो की हे देवी ,  वनवासातील चौदा वर्ष मला एक क्षण सुद्धा निद्रा घेता येणार नाही. तद्वत तू पुढील चौदा वर्षाचा काळ माझ्या प्रति येऊ  नयेस ही माझी आज्ञा आहे तुला"

" त्यावर तीच क़ाय म्हणण होत विस्ताराने सांगाव."

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...