Skip to main content

सौंदर्य वा सुंदरता 


सौंदर्य वा सुंदरता 

सौन्दर्याची अचूक व्याख्या कदाचित ईश्वराच्या व्याख्ये इतकिच कठीण आहे. किंबहुना दोन्ही गोष्टी शब्दात पकड़ण हे प्रायः अशक्य आहे. दोन्हीबद्दल एक मात्र नककीच की ते पाहणाऱ्याच्या मनातल प्रतिबिम्ब असत. जशी मानसिकता पाहणाऱ्याची तस आकलन ईश्वराच आणि सौन्दर्याच. म्हणजेच पाहणाऱ्याच्या मनात ते आधी उमटत नन्तर जाणीवेला प्राप्त होत. 

एक स्पष्ट आहे की सौंदर्य म्हणजे नक्की क़ाय हे वाक्यात सांगण तस मुश्किल आहे. पण जी गोष्ट, वस्तु, दृश्य  अथवा व्यक्ति पाहिल्याने मनाला आनंद, उल्हास, उत्साह आणि सकारात्मकता येते ती कोणतीही गोष्ट सुंदर समजावी. एखादी नाजुक कलाकृति, एखाद  गाण, एखाद  दृश्य, एखादा चेहरा पाहिल्याने मनातला मूळचा आनंद हा उस्फुर्तपणे प्रकट होतो, कोणत्याही विषयाला स्पर्श न करता, म्हणजेच जी प्रतिक्रिया निर्मळ आणि निष्कलंक असते, तेंव्हा समजाव की तिथे सौंदर्य आहे.

सुंदरता ही मनाची ती अनुभूति आहे जी समोरच्या व्यक्तीला अलौकिक आनंद देऊन जाते. सुंदरता ही व्यक्तिसापेक्ष अनुभूति आहे आणि ती निर्मळ असेल तरच ते ख़र सौंदर्य अस म्हणाव लागेल. एखादी सुंदर गोष्ट, वा व्यक्ति पाहून मनाला मिळणाऱ्या प्रसन्नतेमधे सौन्दर्याची पावती दडलेली आहे. सुंदरता ही पाहणाऱ्याला आकृष्ट करते. पण त्यात हव्यास अथवा वखवख नसेल हे नक्की आणि तीच खरी सुंदरता समजावी , बाकीं सर्व वासनेचा बाजार. 

शेवटी इतकच म्हणीन कि ,सुंदरता ही ईश्वराची अनुभूति आणि शुद्ध व पवित्र अंतरातम्याची ती छबी आहे जी पाहणाऱ्याला सामोर दिसते, पण असते प्रत्यक्षात मनात, अन्तर्मनात

सूप्रभात 

© लेखन प्रसन्न आठवले
२४/०५/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...